Coronavirus : रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘हे’ उपाय नक्की ट्राय करा, अनेक रोगांपासून राहाल दूर!

| Updated on: Apr 15, 2021 | 12:16 PM

कोरोना व्हायरसची दुसरी लाट आली आहे. प्रत्येक दिवशी कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

Coronavirus : रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हे उपाय नक्की ट्राय करा, अनेक रोगांपासून राहाल दूर!
Follow us on

मुंबई : कोरोना व्हायरसची दुसरी लाट आली आहे. प्रत्येक दिवशी कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे या दिवसात आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे अत्यंत महत्वाचे आहे. जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच घराबाहेर पडा आणि आपल्या प्रतिकारशक्तीवर विशेष लक्ष द्या. लसीकरणाचे काम जोरात सुरू असले तरी प्रत्येकाला लसी मिळण्यास वेळ लागणार आहे. (Try these remedies to boost your immunity power during corona pandemic)

-ज्यांना लसी देण्यात आली आहे त्यांनीसुद्धा सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवा. खाण्यापिण्याबरोबर व्यायाम करा. चला तर मग टिप्सबद्दल जाणून घ्या ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढेल.

-जर आपल्याला पुरेशी झोप मिळत नसेल तर त्याचा परिणाम आपल्या प्रतिकारशक्तीवर होतो. जेव्हा आपण रात्री झोपता तेव्हा आपले शरीर रोगजनकांना मारण्यासाठी सक्रियपणे कार्य करते. जेव्हा आपण झोपेत असतो तेव्हा शरीर पेशी, विशेषत: मेंदूच्या पेशी दुरुस्त करण्याचे काम करते. झोपण्याच्या दोन तास अगोदर मोबाईल आणि टिव्ही स्क्रीनकडे पाहू नका. तसेच झोपेच्या आधी फाॅफी आणि चहा सारखे पदार्थ घेणे शक्यतो टाळाच.

-ताण आपल्या प्रतिकारशक्तीवर परिणाम करतो. म्हणून दररोज 10 मिनिटे योगासने करा. असे केल्याने आपल्याला ताणतणाव येणार नाही आणि शरीराची प्रतिकारशक्ती देखील मजबूत होईल. शरीरात कोर्टीसोलची पातळी उच्च असल्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होते. ताण कमी करण्यासाठी, दररोज 10 मिनिटे ध्यान किंवा योग करा.

-रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी, व्हिटॅमिन ए, सी, डी, ईसह आहारात जस्त आणि सॅलिनियमयुक्त पोषक घटकांचा समावेश करा. अँटी-ऑक्सिडंट शरीर खराब होण्यापासून प्रतिबंधित करते. याशिवाय शरीरात जळजळही कमी होते. डीएनए पेशी दुरुस्त करतात.

-व्यायामामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती चांगली होते. या व्यतिरिक्त, हे शरीरातील तणावाची पातळी कमी करण्यासाठी कार्य करते. काही काळ व्यायाम केल्याने बॅक्टेरिया नष्ट होण्यास मदत होते तसेच रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. धावणे, पोहणे, व्यायाम करणे आणि वजन उचलणे यासारखे एरोबिक व्यायाम रोगप्रतिकारक शक्तीसाठी फायदेशीर आहेत.

संबंधित बातम्या : 

(Try these remedies to boost your immunity power during corona pandemic)