Diwali Sweets : मधुमेह असला तरी दिवाळीत खाता येईल गोडधोड! घरी बनवा या शुगर फ्री मिठाई, पाहा रेसिपी

Sugar Free Sweets Recipe: दिवाळीचा सण गोडधोड पदार्थांशिवाय अपूर्ण वाटतो. पण या काळात मधुमेही रुग्णांना स्वतःच्या इच्छांवर खूप नियंत्रण ठेवावं लागतं. त्यांच्या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी तुम्ही शुगर फ्री मिठाई बनवू शकता. पाहा या सोप्या रेसिपी.

Diwali Sweets : मधुमेह असला तरी दिवाळीत खाता येईल गोडधोड! घरी बनवा या शुगर फ्री मिठाई, पाहा रेसिपी
शुगर फ्री मिठाई
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Edited By: | Updated on: Nov 05, 2026 | 7:29 PM

दिवाळी म्हटली की फराळ, मिठाई आणि विविध गोड पदार्थांची रेलचेल असते. या दिवसांत प्रत्येक घरी वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. मात्र, मधुमेह असलेल्या व्यक्तींना साखरेमुळे मिठाई खाण्यावर मर्यादा ठेवाव्या लागतात. त्यामुळे इतरांना गोड पदार्थ खाताना पाहून त्यांनाही खाण्याचा मोह होतो. तुमच्या घरातही मधुमेह असलेली व्यक्ती असेल, तर त्यांच्यासाठी काही वेगळे गोड पदार्थ तयार करू शकता. खोबरे, खजूर आणि ड्राय फ्रूट्स यासारख्या पदार्थांपासून घरीच काही मिठाई बनवता येतात. चला तर जाणून घेऊया या शुगर फ्री मिठाईच्या सोप्या रेसिपी.

नारळाचे लाडू

Loading...

हे बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात दूध उकळून बाजूला ठेवा. आता कढईत दोन चमचे तूप गरम करून त्यात किसलेले खोबरे घाला आणि चांगले भाजून घ्या. त्यात किसलेला गूळ घालून सतत हलवत राहा. गूळ विरघळल्यानंतर वेलची पूड आणि चिरलेले बदाम घाला. मिश्रण थोडे थंड झाल्यावर हाताला तूप लावून त्याचे छोटे लाडू वळा.

शाही बर्फी

हे बनवण्यासाठी बदाम, अक्रोड, काजू, अंजीर आणि खजूर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. आता कढईत तूप गरम करून त्यात अंजीर आणि खजूर घालून थोडा वेळ शिजवा. त्यानंतर त्यात बारीक केलेला सुकामेवा घालून सर्व मिश्रण एकत्र करा. हे मिश्रण तूप लावलेल्या प्लेटमध्ये पसरवून बर्फीचा आकार द्या. थंड झाल्यावर त्याच्या वड्या कापून घ्या.

मूग डाळ हलवा

मूग डाळ हलवा बनवण्यासाठी काही तास आधी मूग डाळ भिजवून वाटून घ्या. नंतर कढईत तूप गरम करून त्यात ही वाटलेली मूग डाळ घाला. डाळ मंद आचेवर चांगली भाजून घ्या. त्यानंतर त्यात थोडे पाणी घालून डाळ शिजू द्या. डाळ मऊ झाल्यावर त्यात गूळ घालून व्यवस्थित मिक्स करा. शेवटी बदाम, बेदाणे, काजू, मखाना आणि अक्रोड घालून हलवा तयार करा.

खजूर पेडा

सर्वप्रथम खजुरातील बिया काढून तो मिक्सरमध्ये बारीक करा. कढईत तूप गरम करून त्यात खजुराची पेस्ट घाला आणि मंद आचेवर भाजून घ्या. पेस्ट थोडी घट्ट झाल्यावर त्यात चिरलेले बदाम, पिस्ता, काजू आणि अक्रोड घालून मिक्स करा. मिश्रण थंड झाल्यावर त्याचे छोटे गोळे करून पेड्याचा आकार द्या.

दुधी हलवा

दुधी भोपळ्याचा हलवा बनवण्यासाठी एका कढईत तूप गरम करून त्यात किसलेला दुधी भोपळा घाला. आता त्यात दूध घालून भोपळा चांगला शिजवून घ्या. त्यानंतर त्यात खवा आणि गूळ घालून मिश्रण व्यवस्थित हलवत राहा. मिश्रणातील पाणी आटल्यावर त्यात आवडीनुसार सुकामेवा घाला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us