AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Adinath Kothare : कर्जाचा डोंगर, बँकेनं घर सील केलं अन्…आदिनाथ कोठारेनं सांगितलेला कठीण काळ

Adinath Kothare On Struggle : आदिनाथ कोठारेनं एका जुन्या मुलाखतीत त्याच्या आयुष्यातील कठीण काळ सांगितला होता.

Adinath Kothare : कर्जाचा डोंगर, बँकेनं घर सील केलं अन्...आदिनाथ कोठारेनं सांगितलेला कठीण काळ
| Updated on: Nov 05, 2026 | 7:26 PM
Share

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते महेश कोठारे यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. ‘धुमधडाका’, ‘थरथराट’, ‘झपाटलेला’, ‘पछाडलेला’ यांसारख्या चित्रपटांनी त्यांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. मात्र, यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या महेश कोठारे यांच्या आयुष्यात एक काळ असा होता, जेव्हा त्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. परिस्थिती इतकी बिकट झाली होती की, बँकेनं त्यांच्या मुंबईतील राहत्या घरावर जप्ती आणली होती. एका जुन्या मुलाखतीत महेश कोठारे यांचा मुलगा आणि अभिनेता आदिनाथ कोठारेनं कठीण काळातील आठवणी सांगितल्या होत्या.

आदिनाथ कोठारेनं सांगितला प्रसंग

आदिनाथ कोठारे म्हणालेला की, ‘माझं टीवाय नुकतंच झालं होतं आणि मला पुढचं शिक्षण घ्यायचं होतं. त्यावेळी घरात खूप वाईट परिस्थिती होती. बाबांचे मागचे दोन सिनेमा चालले नव्हते. त्यामुळे खूप मोठं कर्ज त्यांच्यावर होतं. त्यावेळी कोल्हापूरला आम्ही ‘खबरदार’ सिनेमा शूट करत होतो. त्यावेळी मी पहिल्यांदाच वडिलांना असिस्टंट म्हणून काम करत होतो. खूप टेन्शन होतं, घरात गोंधळाचं वातावरण होतं आणि या परिस्थितीत कामावर फोकस ठेऊन सिनेमा करणं कठीण होतं. आमचं शूट सुरू असतांना बँकेनं आमचं मुंबईतलं घर सील करुन टाकलं. म्हणजे आमच्याकडे मुंबईत घरच नव्हतं.’

‘ही गोष्ट मला आणि माझ्या आजी-आजोबांना सांगितलीच नव्हती. या सगळ्या परिस्थितीत ‘खबरदार’चं सगळं शुटिंग संपवलं. या काळात आई-बाबांनी आम्हाला कोणालाच काही कळू दिलं नाही. त्यानंतर मी आणि माझे आजी-आजोबा पुण्याला येऊन राहिलो आणि माझे आई-बाबा मुंबईत घर शोधत होते. त्यानंतर मग आम्ही कांदिवलीत शिफ्ट झालो. २००५ ची ही गोष्ट असेल. अशाही परिस्थिती माझ्या वडिलांनी माझ्या पुढच्या अभ्यासासाठी पुन्हा कर्ज घेतलं. ते कसं फेडणार, काय करणार काही माहित नाही. पण, शिक्षण थांबलं नाही पाहिजे. त्यामुळे माझ्या आयुष्यात तेच माझे शक्तीमान आहेत. म्हणजे आई-वडील दोघंही आहेत.’ असं आदिनाथनं पुढे सांगितलं. ‘लोकमत फिल्मी‘ला दिलेल्या मुलाखतीत आदिनाथ बोलत होता.

Follow Us
जोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान, तोपर्यंत लढाई संसदेतच!
Devendra Fadnavis Vs Rahul Gandhi : जोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान, तोपर्यंत लढाई संसदेतच! मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींवर पलटवार
शरद पवारांवर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु
Sharad Pawar Health Update : शरद पवारांवर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफी योजनेचा चौथा टप्पा पूर्ण; 56 लाख...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफी योजनेचा चौथा टप्पा पूर्ण; 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ
एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; प्रत्येकी एवढ्या हजारांचा बोनस...
ST Employees Diwali Bonus : एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; प्रत्येकी एवढ्या हजारांचा बोनस जाहीर
परीक्षा सुधारणांसाठी गठित समितीचा अंतरिम अहवाल शासनास सादर, नेमकं....
MPSC : परीक्षा सुधारणांसाठी गठित समितीचा अंतरिम अहवाल शासनास सादर, नेमकं अहवालात काय?
मालेगावच्या 101 गावांची पाणीटंचाई दूर होणार! दादा भुसेंचा मोठा निर्णय,
मालेगावच्या 101 गावांची पाणीटंचाई दूर होणार! दादा भुसेंचा मोठा निर्णय, गावागावांत पोहोचणार पिण्याच्या पाण्याचे टँकर
सुनील तटकरेंच्या निकटवर्तीयाचा मोठा निर्णय; तीन विधानसभा मतदार....
Sunil Tatakare : सुनील तटकरेंच्या निकटवर्तीयाचा मोठा निर्णय; तीन विधानसभा मतदारसंघांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, राजीनाम्यामागचं कारण काय?
CM फडणवीसांच्या पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा; म्हणाले, मी इतक्या लवकर..
CM फडणवीसांच्या पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा; म्हणाले, मी इतक्या लवकर काही...
उद्धव ठाकरेंचा सतेज पाटलांना फोन; नेमकं काय म्हणाले?
Uddhav Thackeray On Gokul : उद्धव ठाकरेंचा सतेज पाटलांना फोन; नेमकं काय म्हणाले?
शिंदेंच्या शिवसेनेतून आताच्या घडीची मोठी बातमी; गोकुळच्या मुद्द्यावर..
Shivsena Shinde Group On Gokul : शिंदेंच्या शिवसेनेतून आताच्या घडीची मोठी बातमी; गोकुळच्या मुद्द्यावर व्यक्त केली महत्त्वाची भूमिका