या 7 सीटर कारवर 1.65 लाखांपर्यंत सूट, खरेदीसाठी उडाली झुंबड, लूक देखील जबरदस्त
दिवाळीत या 7 सीटर कारवर मिळतेय 1.65 लाख रुपयांपर्यंत सूट. तर 5 सीटर कारवर देखील मिळतेय 1.50 लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट.

दिवाळीच्या सणानिमित्त वाहन कंपन्यांकडून ग्राहकांसाठी आकर्षक डिस्काउंट आणि ऑफर्स जाहीर केल्या जात आहेत. अशातच अमेरिकन SUV उत्पादक कंपनी Jeep India ने आपल्या ग्राहकांसाठी खास फेस्टिव्ह ऑफर्स आणल्या आहेत. नोव्हेंबर 2026 मध्ये कंपनीच्या लोकप्रिय SUV Jeep Meridian आणि Jeep Compass वर ग्राहकांना मोठ्या सवलतींचा लाभ घेता येणार आहे.
कंपनीच्या 7-सीटर Jeep Meridian वर तब्बल 1.65 लाख रुपयांपर्यंत, तर प्रीमियम 5-सीटर Jeep Compass वर 1.50 लाख रुपयांपर्यंतचे फायदे दिले जात आहेत. या ऑफर्समध्ये कंझ्युमर डिस्काउंट, कॉर्पोरेट बेनिफिट्स तसेच डॉक्टर आणि लीजिंग कंपन्यांसाठी अतिरिक्त सवलतींचा समावेश आहे.
Jeep Meridian वर 1.65 लाख रुपयांपर्यंत फायदा
Jeep ची 7-सीटर SUV खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी ही चांगली संधी आहे. कंपनी Meridian च्या निवडक व्हेरिएंट्सवर एकूण 1.65 लाख रुपयांपर्यंतचे फायदे देत आहे.
विशेष म्हणजे, 2024 मॉडेलचा जुना स्टॉक निवडणाऱ्या ग्राहकांना 1.30 लाख रुपयांपर्यंत कॉर्पोरेट बेनिफिट मिळू शकतो. याशिवाय डॉक्टर आणि लीजिंग कंपन्यांसाठी 30 हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त सवलत दिली जात आहे.
Jeep Compass वर 1.50 लाख रुपयांपर्यंत सूट
Jeep ची भारतीय बाजारपेठेतील लोकप्रिय SUV Compass वरही दिवाळीनिमित्त आकर्षक ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. या कारच्या निवडक व्हेरिएंट्सवर ग्राहकांना 1.50 लाख रुपयांपर्यंत एकूण बचत करता येणार आहे.
निवडक कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांसाठी 1.10 लाख रुपयांपर्यंत कॉर्पोरेट ऑफर्स उपलब्ध आहेत. तसेच डॉक्टर आणि लीजिंग कंपन्यांना 15 हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त फायदा मिळणार आहे.
डिस्काउंट घेताना या गोष्टी लक्षात ठेवा
Jeep च्या या दिवाळी ऑफर्सचा लाभ घेताना ग्राहकांनी काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. या सवलती शहर, राज्य, व्हेरिएंट आणि डीलरशिपमधील उपलब्ध स्टॉकनुसार बदलू शकतात. त्यामुळे गाडी बुक करण्यापूर्वी जवळच्या अधिकृत Jeep डीलरशीपमध्ये जाऊन अंतिम किंमत आणि डिस्काउंटची माहिती घ्यावी.
दरम्यान, दिवाळीत प्रीमियम SUV खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी Jeep Meridian वर 1.65 लाख आणि Compass वर 1.50 लाख रुपयांपर्यंतच्या ऑफर्स फायदेशीर ठरू शकतात. मात्र, या सवलतींचा लाभ घेण्यापूर्वी सर्व अटी आणि शर्ती तपासणे महत्त्वाचे आहे.
