AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प भारताला नडले, अन् मध्यावधी निवडणुकीत धुव्वा, अमेरिकन भारतीयांनी कसा गेम फिरवला?

इराण युद्धामुळे आमचा या निवडणुकीत पराभव झाला, असे ट्रम्प यांचे मत आहे. परंतु कार्नेगीच्या सर्व्हेनुसार 62 टक्के भारतीय-अमेरिकन नागरिकांनी ट्रम्प यांना साथ दिलेली नाही.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प भारताला नडले, अन् मध्यावधी निवडणुकीत धुव्वा, अमेरिकन भारतीयांनी कसा गेम फिरवला?
donald trump and midterm electionImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 05, 2026 | 7:10 PM
Share

Donald Trump : अमेरिकेत नुकतेच मध्यावधी निवडणुका झाल्या. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला जबर धक्का बसला. आता हाऊस ऑफ रिप्रझेंटेटिव्ह आणि सिनेटमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे प्राबल्य झाले आहे. कोणताही धोरणात्मक निर्णय घेताना आता ट्रम्प यांना डेमोक्रॅटिक पक्षाला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, भारतासंदर्भात आखलेल्या धोरणाचा ट्रम्प यांना फटका बसला आहे. भारतीयांच्या रागामुळेच त्यांना या निवडणुकीत फटका बसल्याचे बोलले जातेय.

62 टक्के भारतीय-अमेरिकन नागरिकांनी साथ दिलेली नाही

इराण युद्धामुळे आमचा या निवडणुकीत पराभव झाला, असे ट्रम्प यांचे मत आहे. परंतु कार्नेगीच्या सर्व्हेनुसार 62 टक्के भारतीय-अमेरिकन नागरिकांनी ट्रम्प यांना साथ दिलेली नाही. या मतदारांनी डेमोक्रॅटिक पक्षाला मतं दिली आहेत. रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांना फकत 19 टक्के भारतीय-अमेरिकन नागिकांना मतं दिली आहेत.

भारतीयांना ट्रम्प यांना का मतं दिली नाहीत?

H-1B रिस्ट्रिक्शन : डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसा रजिस्ट्रेशनची फी 1 लाख डॉलरपर्यंत वाढवली. त्यामुळे अमेरिकन-भारतीय नागरिकांत राग होता.

भारतीय आयटी कंपन्यांची चौकशी : डोनाल्ड ट्रम्प यांचे गेल्या काही वर्षातले भारताबाबतचे धोरण हे कठोर राहिलेले आहे. ऑक्टोबर 2026 मध्ये अमेरिकेच्या लेबर डिपार्टमेंटने 8 भारतीय कंपन्यांना लेबर सर्टिफिकेशन प्रोग्रामधून बाजूला सारलं. या निर्णयाचा परिणाम हा एम्प्लॉयर स्पॉन्सरशीपच्या माध्यमातून कायमस्वरुपी नागरिकत्त्व हवा असणाऱ्यांवर झाला.

अमेरिका-भारत संंबंध : अनेक भारतीय-अमेरिकन मतदारांना अमेरिकेचे भारतासंदर्भातले धोरण आवडलेले नाही. कार्नेगीच्या सर्व्हेनुसार 55 टक्के भारतीय-अमेरिकनांना ट्रम्प हे द्विपक्षायी संबंध सांभाळण्यास अपयशी ठरले आहेत, असे वाटते. त्याचाही परिणाम म्हणून ट्रम्प यांना निवडणुकीत फटका बसला असावा.

पाकिस्तानशी संबंध : गेल्या काही वर्षात अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारले आहेत. याच कारणामुळे भारतीय-अमेरिकन नागरिकांत नाराजी आहे. त्याचाही परिणाम या निवडणुकीवर झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जातोय.

डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थलांतराविषयी कठोर भूमिका राहिलेली आहे. त्यांचे अमेरिका फस्ट हे धोरण राहिलेले आहे. त्याचाही फटका ट्रम्प यांना बसला असावा, असे बोलले जातेय.

Follow Us
जोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान, तोपर्यंत लढाई संसदेतच!
Devendra Fadnavis Vs Rahul Gandhi : जोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान, तोपर्यंत लढाई संसदेतच! मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींवर पलटवार
शरद पवारांवर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु
Sharad Pawar Health Update : शरद पवारांवर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफी योजनेचा चौथा टप्पा पूर्ण; 56 लाख...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफी योजनेचा चौथा टप्पा पूर्ण; 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ
एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; प्रत्येकी एवढ्या हजारांचा बोनस...
ST Employees Diwali Bonus : एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; प्रत्येकी एवढ्या हजारांचा बोनस जाहीर
परीक्षा सुधारणांसाठी गठित समितीचा अंतरिम अहवाल शासनास सादर, नेमकं....
MPSC : परीक्षा सुधारणांसाठी गठित समितीचा अंतरिम अहवाल शासनास सादर, नेमकं अहवालात काय?
मालेगावच्या 101 गावांची पाणीटंचाई दूर होणार! दादा भुसेंचा मोठा निर्णय,
मालेगावच्या 101 गावांची पाणीटंचाई दूर होणार! दादा भुसेंचा मोठा निर्णय, गावागावांत पोहोचणार पिण्याच्या पाण्याचे टँकर
सुनील तटकरेंच्या निकटवर्तीयाचा मोठा निर्णय; तीन विधानसभा मतदार....
Sunil Tatakare : सुनील तटकरेंच्या निकटवर्तीयाचा मोठा निर्णय; तीन विधानसभा मतदारसंघांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, राजीनाम्यामागचं कारण काय?
CM फडणवीसांच्या पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा; म्हणाले, मी इतक्या लवकर..
CM फडणवीसांच्या पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा; म्हणाले, मी इतक्या लवकर काही...
उद्धव ठाकरेंचा सतेज पाटलांना फोन; नेमकं काय म्हणाले?
Uddhav Thackeray On Gokul : उद्धव ठाकरेंचा सतेज पाटलांना फोन; नेमकं काय म्हणाले?
शिंदेंच्या शिवसेनेतून आताच्या घडीची मोठी बातमी; गोकुळच्या मुद्द्यावर..
Shivsena Shinde Group On Gokul : शिंदेंच्या शिवसेनेतून आताच्या घडीची मोठी बातमी; गोकुळच्या मुद्द्यावर व्यक्त केली महत्त्वाची भूमिका