AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकाच वेळी 12 विमानांचं इमर्जन्सी लँडिंग, प्रवाशांची पाचावर धारण, घटनेनं मोठी खळबळ

एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक नाही दोन नाही तर तब्बल बारा विमानांचं इमर्जन्सी लँडिंग करण्याची वेळ आली आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये चांगलंच भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, मोठी खळबळ उडाली.

एकाच वेळी 12 विमानांचं इमर्जन्सी लँडिंग, प्रवाशांची पाचावर धारण, घटनेनं मोठी खळबळ
विमानांचं इमर्जन्सी लँडिंग Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 05, 2026 | 6:52 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, विमानात बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीमुळे संपूर्ण युरोपात प्रचंड खळबळ उडाली आहे. एका धमकीमुळे युरोपातील सुरक्षा यंत्रणांची चांगलीच धावपळ उडाल्याचं पहायला मिळालं. एक नाही दोन नाही तर तब्बल 12 विमानांची इमर्जन्सी लँडिंग करावी लागली आहे. एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा अशी घटना घडली आहे. विमानात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन येताच संपूर्ण युरोप खंडातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. तब्बल 12 विमानांचं इमर्जन्सी लँडिंग करण्याचा निर्णय घेतला, तसेच सुरक्षा बंदोबस्तामध्ये देखील मोठी वाढ करण्यात आली. तातडीने हाय अलर्ट जारी करण्यात आला. यावेळी डबलिनवरून रोमला जाणाऱ्या ‘Aer Lingus’ प्लाइटला फ्रान्सच्या एवरेक्स विमानतळावर सुरक्षित उतरवण्यात आलं.

तर दुसरीकडे हेलसिंकीवरून रोमला जाणारं विमान इटलीच्या वायुसेनेच्या निगरानीखाली रोम फिमिसिनो एयरपोर्टवर इमर्जन्सी लँड करण्यात आलं. त्यानंतर इटलीच्या पोलिसांनी या विमानाची कसून तपासणी केली मात्र विमानामध्ये कोणत्याही प्रकाचे स्फोटकं आढळून आलेले नाहीत. त्यानंतर पोलंड एअर लाईन्सच एक विमान बेल्जियमच्या ब्रसेल्स जावेंटम विमानतळावर इमर्जन्सी लँड करण्यात आलं आहे. या विमानाची देखील कसून तपासणी करण्यात आली, मात्र त्यामध्ये देखील कोणतीही संशयित वस्तू आढळून आलेली नाहीये.

या व्यतिरिक्त बुल्गारियामध्ये तीन विमानांचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे. ज्यामध्ये कोपेनहेगन इथून आलेल्या दोन विमानाचा तर लंडन विमानतळावरून आलेल्या एका विमानाचा समावेश आहे. त्याचप्रमाणे झेक रिपब्लिकची राजधानी प्राग येथून निघालेल्या चार विमानात देखील बॉम्ब ठेवले असल्याची धमकी देण्यात आली होती. या विमानांची देखील सुरक्षा यंत्रणांकडून तपासणी करण्यात आली, तपासणीनंतरच या विमानांच्या उड्डाणाला परवानगी देण्यात आली. तब्बल 12 विमानांचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्यामुळे प्रवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली होती.

प्रवाशांमध्ये भीतीच वातावरण 

एकाचवेळी विविध विमानात बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी देण्यात आल्यामुळे प्रवाशांमध्ये चांगलंच भीतीचं वातावरण निर्माण झालं. प्रवाशांची पाचावर धारणं बसली, परंतु कोणत्याही विमानात बॉम्ब आढळून आलेला नाहीये.

Follow Us
शरद पवारांवर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु
Sharad Pawar Health Update : शरद पवारांवर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफी योजनेचा चौथा टप्पा पूर्ण; 56 लाख...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफी योजनेचा चौथा टप्पा पूर्ण; 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ
एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; प्रत्येकी एवढ्या हजारांचा बोनस...
ST Employees Diwali Bonus : एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; प्रत्येकी एवढ्या हजारांचा बोनस जाहीर
परीक्षा सुधारणांसाठी गठित समितीचा अंतरिम अहवाल शासनास सादर, नेमकं....
MPSC : परीक्षा सुधारणांसाठी गठित समितीचा अंतरिम अहवाल शासनास सादर, नेमकं अहवालात काय?
मालेगावच्या 101 गावांची पाणीटंचाई दूर होणार! दादा भुसेंचा मोठा निर्णय,
मालेगावच्या 101 गावांची पाणीटंचाई दूर होणार! दादा भुसेंचा मोठा निर्णय, गावागावांत पोहोचणार पिण्याच्या पाण्याचे टँकर
सुनील तटकरेंच्या निकटवर्तीयाचा मोठा निर्णय; तीन विधानसभा मतदार....
Sunil Tatakare : सुनील तटकरेंच्या निकटवर्तीयाचा मोठा निर्णय; तीन विधानसभा मतदारसंघांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, राजीनाम्यामागचं कारण काय?
CM फडणवीसांच्या पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा; म्हणाले, मी इतक्या लवकर..
CM फडणवीसांच्या पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा; म्हणाले, मी इतक्या लवकर काही...
उद्धव ठाकरेंचा सतेज पाटलांना फोन; नेमकं काय म्हणाले?
Uddhav Thackeray On Gokul : उद्धव ठाकरेंचा सतेज पाटलांना फोन; नेमकं काय म्हणाले?
शिंदेंच्या शिवसेनेतून आताच्या घडीची मोठी बातमी; गोकुळच्या मुद्द्यावर..
Shivsena Shinde Group On Gokul : शिंदेंच्या शिवसेनेतून आताच्या घडीची मोठी बातमी; गोकुळच्या मुद्द्यावर व्यक्त केली महत्त्वाची भूमिका
डंके की चोट पर...; SIR च्या मुद्द्यावर अमित शाहांचा विरोधकांना इशारा
Amit Shah On SIR : डंके की चोट पर...; SIR च्या मुद्द्यावर अमित शाहांचा विरोधकांना थेट इशारा