AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kitchen Hack: डस्टबिनमधून दुर्गंधी येतेय? फक्त ‘ही’ एक ट्रिक करा, वास होईल गायब!

डस्टबिन उघडताच येणारा घाणेरडा वास घरातील वातावरण खराब करतो. ही दुर्गंधी घालवण्यासाठी महागडे प्रोडक्ट्स घेण्याची गरज नाही; स्वयंपाकघरात सहज मिळणाऱ्या एका पदार्थाने हा वास कमी करता येतो. हा पदार्थ कोणता ते येथे पाहा.

Kitchen Hack: डस्टबिनमधून दुर्गंधी येतेय? फक्त 'ही' एक ट्रिक करा, वास होईल गायब!
dustbinImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Sep 26, 2026 | 8:08 PM
Share

किचन कितीही स्वच्छ ठेवले तरी डस्टबिनमधून दुर्गंधी येत असेल, तर संपूर्ण घरात अस्वच्छतेसारखे वातावरण जाणवू शकते. विशेषतः ओला कचरा जास्त वेळ डस्टबिनमध्ये राहिल्यास त्यातून येणारा वास आणखी तीव्र होतो. अशावेळी महागडे फ्रेशनर किंवा सुगंधी प्रोडक्ट्स वापरण्याऐवजी घरात सहज उपलब्ध असलेल्या एका पदार्थाची मदत घेता येते. डस्टबिनमधील दुर्गंधी कमी करण्याची ही सोपी ट्रिक तुम्हीही ट्राय करू शकता. यासाठी फार वेळ किंवा विशेष साहित्याची गरज नाही.

डस्टबिनमधून दुर्गंधी का येते?

डस्टबिनमध्ये टाकलेला ओला कचरा हळूहळू कुजण्यास सुरुवात होते. कचऱ्यामध्ये असलेली आर्द्रता आणि उष्णता यामुळे दुर्गंधी निर्माण होऊ शकते. डस्टबिन नियमितपणे स्वच्छ केलं नाही किंवा त्यात ओला कचरा जास्त वेळ ठेवला, तर हा वास आणखी वाढतो. त्यामुळे केवळ कचऱ्याची पिशवी बदलणे पुरेसे नसून डस्टबिनची नियमित स्वच्छता करणेही महत्त्वाचे आहे.

करून पाहा ही खास ट्रिक

सर्वप्रथम डस्टबिन पूर्णपणे रिकामा करा. त्यानंतर पाणी आणि क्लिनिंग सोल्युशनच्या मदतीने डस्टबिन आतून व्यवस्थित धुवून घ्या. धुतल्यानंतर ते पूर्णपणे कोरडं होऊ द्या. डस्टबिनमध्ये ओलावा राहणार नाही याची काळजी घ्या. डस्टबिन पूर्णपणे सुकल्यानंतर त्याच्या तळाशी साधारण २ चमचे बेकिंग सोडी टाका. त्यावर नेहमीप्रमाणे नवीन गार्बेज बॅग लावा. प्रत्येक वेळी नवीन बॅग लावण्यापूर्वी हीच पद्धत पुन्हा करता येते.

कसा काम करतो बेकिंग सोडा?

बेकिंग सोड्यामध्ये दुर्गंधी शोषून घेण्याची क्षमता असते. डस्टबिनमधील कचरा आणि ओलाव्यामुळे निर्माण होणारा तीव्र वास कमी करण्यास तो मदत करू शकतो. डस्टबिनच्या तळाशी बेकिंग सोडा टाकल्याने दुर्गंधी निर्माण करणारे काही घटक शोषले जाण्यास मदत होते आणि डस्टबिन तुलनेने फ्रेश राहू शकतो. मात्र बेकिंग सोडा हा डस्टबिनच्या नियमित स्वच्छतेचा पर्याय नाही.

डस्टबिनचा वास टाळण्यासाठी या सवयी लावा

डस्टबिनमधील दुर्गंधी कमी ठेवण्यासाठी काही छोट्या सवयी उपयोगी ठरू शकतात. • ओला कचरा रोज बाहेर काढा: कचरा जास्त वेळ डस्टबिनमध्ये साठवून ठेवू नका. • डस्टबिन कोरडा ठेवा: डस्टबिन धुतल्यानंतर तो पूर्णपणे सुकल्यावरच नवीन बॅग लावा. • कचऱ्याची पिशवी वेळेवर बदला: पिशवी खूप भरलेली किंवा फाटलेली असल्यास ती लगेच बदला. • झाकण बंद ठेवा: शक्य असल्यास डस्टबिनचे झाकण नेहमी बंद ठेवावे. • वेळोवेळी उन्हात ठेवा: डस्टबिन स्वच्छ केल्यानंतर काही वेळ उन्हात ठेवल्यास त्यातील ओलावा कमी होण्यास मदत होऊ शकते.

Follow Us
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; अमित शाहांकडे केली मागणी...
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; चौकशी अहवालाबाबत अमित शाहांकडे केली मोठी मागणी!
गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
Amit Shah Speech : गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; एकनाथ शिंदे यांचं भावनिक विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
Sunetra Pawar : पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पहा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
Latur Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर