AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

turmeric side effects : या लोकांनी हळदीचे सेवन करणे टाळावे

Turmeric : हळद आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. आयुर्वेदात हळदीला फार गुणकारी म्हटले आहे. हळदीचा आपल्या आहारात आपण समावेश करतो. पण हीच हळद काही लोकांसाठी समस्या वाढवणारी ठरु शकते. जाणून घ्या कोणत्या रुग्णांनी आणि कोणती समस्या असल्यावर हळदीचे सेवन करु नये.

turmeric side effects : या लोकांनी हळदीचे सेवन करणे टाळावे
काही पदार्थ खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यातला एक अत्यंत महत्त्वाचा पदार्थ म्हणजे हळद! हळदीशिवाय जेवण अधुरं, आपल्या प्रत्येक भाजीत हळद असते. हळदीचं दूध प्यायल्याने सुद्धा आरोग्यासाठी खूप फायदा होतो. हळदीत सुद्धा चांगल्या प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स असतात.
| Edited By: | Updated on: Feb 12, 2024 | 6:48 PM
Share

Disadvantage of turmeric : भारतात प्रत्येकाच्या किचनमध्ये हळद ही आढळतेच. कारण प्रत्येक भाजीत किंवा इतर पदार्थांमध्ये हळदीचा वापर केला जातो. हळदीमुळे भाजीला रंग ही चांगला येतो. पण हळदीचे शरीराला खूप फायदे देखील असतात. हळदीला आयुर्वेदात महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. आरोग्यच नाही तर हळद ही सौंदर्य देखील वाढवते. पण तुम्हाला माहित आहे का की काही लोकांसाठी हळदीचे सेवन हे हानिकारक देखील ठरु शकते. हळदीच्या अतिसेवनामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. हळद खाण्याचा सल्ला दिला जातो पण कोणत्या परिस्थितीमध्ये हळद खाणे टाळावे हे जाणून घ्या.

मधुमेहाच्या रुग्णानी जास्त हळद खाणे टाळावे

मधुमेह आणि हळदीचा तसा काहीही संबंध नसला तरी, आयुर्वेदात रक्त पातळ करणारी औषधे घेत असलेल्या रुग्णांना जास्त हळद खाण्याचा सल्ला देत नाही. हळदीचे सेवन केल्याने शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यापासून प्रतिबंध होतो आणि जर रुग्ण त्यासाठी कोणतेही औषध घेत असेल तर हळदीचे जास्त सेवन करणे त्याच्यासाठी हानिकारक ठरू शकते.

कावीळचे रुग्णांनी हळदी खाणे टाळावे

कावीळच्या रुग्णांनी हळदीचे सेवन कमीच करावे. हळदीच्या सेवनाबाबत तुमच्या डॉक्टरांशी नक्की सल्ला घ्यावा.

स्टोनच्या रूग्णांनी हळद टाळावी

ज्या लोकांना स्टोर होत असेल त्यांनी हळद कमी प्रमाणात खावी. हळदीमध्ये विरघळणारे ऑक्सलेटचे उच्च स्तर असतात जे कॅल्शियमशी सहजपणे बांधू शकतात आणि अघुलनशील कॅल्शियम ऑक्सलेट तयार करतात. अघुलनशील कॅल्शियम ऑक्सलेटमुळे ७५% किडनी समस्या उद्भवतात.

अॅनिमियाच्या रुग्णांनी हळद खाणे टाळावे

ज्यांना अॅनिमियाचा त्रास आहे त्यांनी हळदीचे सेवन कमी प्रमाणात करावे. हळदीचे जास्त सेवन केल्याने शरीरात लोहाचे शोषण वाढते आणि त्यामुळे अॅनिमियाची समस्या वाढते.

रक्त पातळ करणारी औषधे घेणारे

रक्त पातळ करणारी औषधे घेणार्‍यांनी देखील हळदीचे सेवन कमी प्रमाणात करावे. कारण हळदही याच पद्धतीने काम करते आणि औषधांसोबत तिचे सेवन केल्यास समस्या वाढू शकतात.

भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.