AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सोयाबीन’चा फेसपॅक वापरा, चेहऱ्यावरील डाग करा छुमंतर; वाचा सविस्तर

चेहऱ्यावरील डाग चेहऱ्याचे सौंदर्य खराब करतात. सोयाबीनपासून बनवलेल्या फेसपॅकच्या वापरामुळे हे डाग दूर होतात.

'सोयाबीन'चा फेसपॅक वापरा, चेहऱ्यावरील डाग करा छुमंतर; वाचा सविस्तर
सुंदर त्वचा
| Edited By: Anish Bendre | Updated on: May 23, 2021 | 7:02 AM
Share

मुंबई : चेहऱ्यावरील डाग चेहऱ्याचे सौंदर्य खराब करतात. सोयाबीनपासून बनवलेल्या फेसपॅकच्या वापरामुळे हे डाग दूर होतात. यासाठी सोयाबीनमध्ये दही आणि लिंबू मिसळून पेस्ट बनवा. हा फेस पॅक 10 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा. सोयाबीनमध्ये व्हिटामिन ई असते जे त्वचेतील मृत पेशी काढून टाकते आणि नवीन पेशी तयार करते. यासाठी सोयाबीन बारीक करून त्यात पाणी घालून त्याची पेस्ट बनवा. (Use a face pack made from soybeans to remove blemishes on the face)

ही पेस्ट 20-25 मिनिटे चेहऱ्यावर लावल्याने चेहरा सुधारतो. आपण आठवड्यातून तीनदा हा मास्क वापरू शकता. सोयाबीन हा प्रथिनांचा चांगला स्रोत मानला जातो, म्हणून तो आहारात सामील करणे पौष्टिक असते. सोयाबीन तुमचे सौंदर्य वाढवण्यात देखील मदत करू शकते. खरं तर, सोयाबीनमध्ये व्हिटामिन ई आणि व्हिटामिन ए बरोबरच भरपूर खनिज घटक असतात, जे त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात.

त्वचेच्या घट्टपणासाठी देखील सोयाबीन खूप फायदेशीर आहे. यासाठी सोयाबीनमध्ये डाळिंबाची दाणे जाडसर वाटून, त्यात थोडी हळद मिसळून चेहऱ्यावर लावा. साधारण 10 मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून टाका. असे केल्याने चेहर्‍याची चमक वाढेल आणि घट्टपणाही येईल. 1 चमचे संत्र्याच्या सालीचा पावडर घ्या त्यामध्ये 1 चमचा हळद आणि 1 चमचे मध घालाव. ही हे पेस्ट चांगली मिक्स करा यानंतर 5 ते 10 मिनिटे चेहऱ्यावर ही पेस्ट लावून ठेवा. नंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.

त्वचा तेलकट असल्यास एका वाटीमध्ये संत्र्याच्या सालींची पेस्ट आणि चंदन पावडर एकत्र घ्या व फेस पॅक तयार करा. या पॅकमुळे तेलकट त्वचेवरील मुरुमांची समस्या हळूहळू दूर होण्यास मदत मिळू शकते. त्वचेवर नैसर्गिक तेज येईल आणि त्वचा सैल देखील पडणार नाही. तसंच मुरुम आणि ब्लॅकहेड्सची समस्या देखील दूर होण्यास मदत मिळू शकते.मुरुमांची समस्या दूर करण्यासाठी आणि चेहरा निखारण्यासाठी दही आणि अळशीचा फेसपॅक खूप प्रभावी आहे.

दही चेहऱ्याला मॉइश्चराईझ करण्याचे काम करते, तर अळशीमध्ये व्हिटॅमिन ई असते, ज्यामुळे त्वचा चमकते आणि निरोगी होते. पॅक बनविण्यासाठी, एक चमचा अळशीच्या बिया रात्रभर पाण्यात भिजवा. सकाळी हे वाटून दोन चमचे दह्यामध्ये मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. सुमारे 15 मिनिटे ते अर्धा तास ठेवा. यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हे करा.

संबंधित बातम्या : 

(Use a face pack made from soybeans to remove blemishes on the face)

Follow Us
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा टाकताच...
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
Video | माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यूचा थरार! पहा व्हिडीओ
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल