‘या’ टिप्स फाॅलो करा आणि फाटे फुटलेल्या केसांना आजच म्हणा गुडबाय !

| Updated on: Mar 30, 2021 | 12:03 PM

केसांना फाटे फुटणं ही एक तक्रार आता सामान्य झाली आहे. खासकरून महिलांच्या केसांना फाटे फुटतात.

या टिप्स फाॅलो करा आणि फाटे फुटलेल्या केसांना आजच म्हणा गुडबाय !
या घरगुती कंडीशनरमुळे आपले केस मुलायमदार आणि सुंदर दिसतील. (टीप – कोणत्याही वैद्यकीय, आयुर्वेदिक सल्ल्याचं पालन करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Follow us on

मुंबई : केसांना फाटे फुटणे ही एक तक्रार आता सामान्य झाली आहे. खासकरून महिलांच्या केसांना फाटे फुटतात. केसांना वापरण्यात येणारे केमिकल्स आणि हेअर स्ट्रेटनर यामुळे केसांना फाटे फुटण्याचा धोका जास्त असतो. फाटे हे केसांना कुठेही फुटू शकतात. पण शक्यतो लांब केसांच्या शेवटच्या टोकाला फुटतात. (Use these tips to prevent split ends hairs)

अनेक महिलांना आपले सुंदर आणि लांबसडक केस कट करावे लागतात. मात्र, आज आम्ही तुम्हाला काही खास उपाय सांगणार आहोत ज्यामुळे केसांना फाटे फुटण्याची तुमची समस्या नक्कीच दूर होण्यास मदत होईल.

-केसांना मजबूत आणि चांगले करण्यासाठी अवाकाडो हेअर मास्क अत्यंत फायदेशीर मानले जाते. अवाकाडो हेयर मास्क तयार करण्यासाठी एक अंडे आणि ऑलिव्ह तेल घ्या अंड्यामध्ये हे तेल व्यवस्थित मिक्स करा आणि केसांना लावा साधारण 20 ते 25 मिनिटे हे तसेच ठेवा यानंतर पाण्याने केस धूवुन घ्या.

-मध आणि ऑलिव्ह तेल त्वचा आणि केसांसाठी दोन्ही फायदेशीर आहे. या दोन गोष्टी एकत्रितपणे लावल्यास केस चमकदार होतात. एक चमचा मध आणि दोन चमचे ऑलिव्ह तेल मिक्स करुन केसांना लावा. हे मिश्रण 20 मिनिटे ठेवा आणि नंतर ते पाण्याने धुवा.

-केसांना फाटे फुटण्याचे मुख्य कारण म्हणजे कलर किंवा केमिकल हे आहे. यामुळे शक्यतो आपल्या केसांना केमिकल आणि कलर लावणे टाळले पाहिजे. कारण केमिकलचा घातक परिणाम आपल्या केसांवर होतो.

-चांगले केस होण्यासाठी आपण आहारात काय खातो हे देखील तितकेच महत्वाचे आहे. यासाठी आहारात प्रोटीन, फॅट्स, कॅल्शियम, आर्यन आणि झिंक या घटकांचा समावेश करावा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Kidney Stone | मुतखड्याच्या समस्येने त्रस्त आहात? मग, चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ!

Skimmed  Milk | स्किम्ड दुधाचे सेवन करताय? थांबा! आधी जाणून घ्या याचे दुष्परिणाम…

(Use these tips to prevent split ends hairs)