Aloevera | बहुगुणकारी ‘कोरफड’, चमकदार त्वचेसह वजन कमी करण्यास उपयुक्त!

‘बहुगुणी’ असणाऱ्या कोरफडीचा वापर बऱ्याचश्या सौंदर्यवर्धक उत्पादनांमध्ये देखील केला जातो.

Aloevera | बहुगुणकारी ‘कोरफड’, चमकदार त्वचेसह वजन कमी करण्यास उपयुक्त!
Follow us
| Updated on: Sep 22, 2021 | 9:45 PM

मुंबई : कोरफड ही वनस्पती आपल्या थंडावा देण्याच्या गुणांमुळे ओळखली जाते. ‘बहुगुणी’ असणाऱ्या कोरफडीचा वापर बऱ्याचश्या सौंदर्यवर्धक उत्पादनांमध्ये देखील केला जातो (Benefits of aloevera). अगदी कुठल्याही ऋतूत कोरफडीचा वापर करता येतो. कोरफडीच्या पानांमध्ये ए, बी1, बी2, बी3, बी6, बी12, सी, ई आणि फॉलिक अॅसिड यांसारखी पोषक तत्व आढळतात. आरोग्याच्या दृष्टीने कोरफडाची पाने ही नैसर्गिकरित्या प्रभावशाली आयुर्वेदीक वनस्पती आहे. कोरफडीचा गर त्वचेला थंडावा देतो (Beauty tips And Benefits of aloevera).

कोरफडीच्या औषधी गुणांमुळे खरचटल्यास, कापल्यास, भाजल्यास किंवा एखादा किडा चावल्यास प्रथमोपचार म्हणून कोरफडचा वापर केला जातो. जगभरात कोरफडीच्या तब्बल 400 हून अधिक प्रजाती आढळतात. परंतु, त्यापैकी केवळ 5 प्रजाती वापरल्या जातात. कोरफडात असलेल्या गुणांमुळे केस दाट आणि सुंदर होण्यास मदत होते. ही वनस्पती केसांच्या मुळातील पीएच घटकाचे संतुलन कायम राखण्यास मदत करते. कोरफडीने केस गळणे थांबते, केसांची वाढ चांगली होते, केसांतील कोंडा जातो, स्कॅल्पच्या समस्या दूर होतात आणि केसांचे चांगले पोषणही होते.

मऊ आणि मुलायम ओठांसाठी

कोरफडीत मुबलक प्रमाणात ‘ई’ जीवनसत्व आढळते. त्यामुळे सुकलेल्या किंवा फाटलेल्या ओठांसाठी ही वनस्पती औषध ठरते. फाटलेल्या ओठांवर कोरफडीचा गर लावल्यास ओठ मुलायम होतात. कोरफडीच्या गरात थोडेसे ऑलिव्ह तेल मिसळून लिप बामसारखे देखील वापरु शकता (Beauty tips And Benefits of aloevera).

सुंदर डोळ्यांसाठी

सकाळी उठल्यावर डोळे सुजलेले आणि थकल्यासारखे जाणवत असल्यास कोरफडीचे पान मध्यभागी कापून डोळ्यावर ठेवल्यास आराम वाटेल. डोळ्यांच्या भोवती कोरफड जेल लावल्यास काळीवर्तुळे नाहीशी होतात. कित्येक अंडर आय क्रीम्समध्ये देखील कोरफडीचा वापर केला जातो.

मॉइश्चरायजर

कोरफडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्वचा हायड्रेट राहते. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचा कोरडी पडते. यावेळी कोरफड जेलचा वापर मॉइश्चरायजरसारखा करू शकता. कोरफड जेल तुम्ही नखांनाही लावू शकता. हे जेल नखांनासुध्दा मॉइश्चरायज करुन मजबूत आणि चमकदार बनवेल (Beauty tips And Benefits of aloevera).

बॉडी स्क्रब

कोरफड जेलमध्ये थोडीशी साखर आणि लिंबाचा रस मिसळून त्याचा स्क्रब तयार करू शकता. हा स्क्रब त्वचेवरील डेड स्कीन तर काढतोच आणि त्वचेलाही हायड्रेट ही करतो. यामुळे तुमची त्वचा मऊ, मुलायम आणि स्वच्छ होते. याशिवाय कोरफडाच्या रसात थोडेसे नारळाच्या तेलाचे थेंब घालून ते गुडघे, टाचा आणि हाताच्या कोपराला लावल्यास काळेपणा दूर होतो.

वजनात घट

कोरफडीचा गर वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. कोरफडमध्ये व्हिटामिन आणि फायबर गुणधर्म असतात. दररोज कोरफडीचा रस प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

(Beauty tips And Benefits of aloevera)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.