Weight Loss | जेवणानंतर चालल्याने वजन कमी होईल, नवीन संशोधनाचा मनोरंजक निष्कर्ष!

| Updated on: Oct 15, 2020 | 5:09 PM

दररोज किती व्यायाम करावा, यासाठी कोणताही नियम अथवा मर्यादा नाही. आपण कुठला व्यायाम प्रकार करतो यावर ते अवलंबून असते.

Weight Loss | जेवणानंतर चालल्याने वजन कमी होईल, नवीन संशोधनाचा मनोरंजक निष्कर्ष!
Walking
Follow us on

मुंबई : चालणे आणि धावणे ही व्यायामाचे सर्वोत्तम पर्याय आहेत. दररोज चालणे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते. जे लोक व्यायामशाळेत जाऊ शकत नाहीत किंवा कठीण व्यायाम करू शकत नाहीत त्यांच्यासाठी तंदुरुस्त आणि निरोगी राहण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. जेवल्यानंतर चालणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर (Walking helps weight loss) असल्याचे, एका संशोधनादरम्यान सिद्ध झाले आहे. तसेच, वजन कमी करण्यासाठी देखील जेवणानंतर चालणे फायदेकारक ठरत असल्याचे तज्ज्ञांचे म्हटले आहे. (Walking after having meal helps to weight loss claimed by research)

आपण किती चालले पाहिजे? तसेच, वजन कमी करण्यासाठी किती वेळ चालत राहिले पाहिजे, या सर्व गोष्टींची माहिती संशोधनात देण्यात आली आहे.

चालण्यासाठी योग्य वेळ

दिवसाच्या कुठल्याही प्रहरी चालणे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप चांगले आहे. शिवाय, जेवल्यानंतर चालणे वजन कमी करण्यात आणि मधुमेह नियंत्रण ठेवण्यास मदत करते. ज्यांना अद्याप कोणताही आजार नाही, अशा लोकांनी कायम चालण्याची सवय लावून घेतली पाहिजे. या व्यायामामुळे भविष्यात कोणताही आजार होण्याची शक्यता कमी असते.

वजन कमी करण्यासाठी चालणे फायदेशीर

आपल्या शरीरात दररोज काही प्रमाणात कॅलरी कमी होत असतात. आपण दररोज किती काम करत आहोत यावर ते अवलंबून असते. रोजची कामे करताना काही प्रमाणत कॅलरी आपोआप बर्न केल्या जातात. मात्र, जर आपण दररोज थोडे चाललो तर, अधिक कॅलरी बर्न होऊ शकतात. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत (Walking helps weight loss) होते. 2016मध्ये एका संशोधनात असे आढळले की, टाइप- 2 मधुमेह असणाऱ्या लोकांमध्ये जेवणानंतर, 10 मिनिटे चालल्यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीत घट झाल्याचे दिसून आले. दिवसाच्या इतर कोणत्याही वेळी 30 मिनिटे चालण्यापेक्षा, जेवणानंतर 10 मिनिटे चालणे अधिक फायदेशीर ठरते. (Walking after having meal helps to weight loss claimed by research)

चालण्यामुळे रक्तातील साखर आणि वजन होते कमी

जेव्हा आपण चालतो किंवा काही व्यायाम करतो, तेव्हा आपल्या हृदयाची गती वाढते. त्यावेळी आपले शरीर कार्बोहायड्रेट किंवा साखर प्राथमिक ऊर्जा स्त्रोत म्हणून वापरते. जेव्हा आपण जेवल्यानंतर चालतो, तेव्हा आपल्या स्नायूंना अधिक साखरेची आवश्यकता असते, त्यावेळी आपले शरीर रक्तातील अतिरिक्त साखर वापरते. ज्यामुळे शरीरातील साखर नियंत्रित राहते आणि वजन कमी करण्यास देखील मदत होते.

दररोज किती व्यायाम करावा?

दररोज किती व्यायाम करावा, यासाठी कोणताही नियम अथवा मर्यादा नाही. आपण कुठला व्यायाम प्रकार, किती वेळासाठी करतो यावर ते अवलंबून असते. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, आठवड्यात सुमारे 150 मिनिटे एरोबिक व्यायाम केला पाहिजे. तर, दररोज 21 मिनिटे चालले पाहिजे, ज्यामुळे हृदयरोग आणि टाइप -2 मधुमेहाचा धोका कमी होतो.

संबंधित बातम्या :

दिवाळीत गोड पदार्थ खाऊनही वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी टिप्स

4 महिन्यात तब्बल 26 किलो वजन कसं घटवलं? सानियाकडून फोटो-व्हिडीओ शेअर

(Walking after having meal helps to weight loss claimed by research)