HEALTH | वजन कमी करायचंय?, मग ‘हे’ 5 व्यायाम प्रकार टाळाच!

जर तुम्ही वजन कमी करू इच्छित असाल, तर काही व्यायामप्रकार शक्यतो टाळले पाहिजेत. हे व्यायाम प्रकार तुमचे वजन कमी करण्यात पप्रभावी ठरत नाहीत.

HEALTH | वजन कमी करायचंय?, मग ‘हे’ 5 व्यायाम प्रकार टाळाच!
Follow us
| Updated on: Oct 09, 2020 | 5:03 PM

मुंबई : आजच्या काळात जर लोकांना आरोग्याशी (Health) संबंधित कोणतीही समस्या उद्भवली असेल तर, त्यामागील मुख्य कारण वाढलेले वजन आहे.  आपली जीवनशैली अशी बनली आहे की, आपण काहीही आणि केव्हाही खात असतो, ज्यामुळे वजन वाढत जाते. या दोन्ही गोष्टी देखील आरोग्यासाठी हानिकारक आहेत. शिवाय यामुळे आपण खूप सुस्तावतो आणि आळशी होतो. अशा परिस्थितीत लोक वजन कमी करण्यासाठी एकतर जिमकडे धाव घेतात किंवा ऑनलाईन बघून काही व्यायाम प्रकार करायला सुरुवात करतात. (Health tips Avoid 5 exercise to burn fat)

जिममध्ये जाऊन घाम गाळणे बर्‍याच वेळा वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. परंतु, ऑनलाईन व्यायामाद्वारे हे शक्य होईलच असे नाही. ऑनलाईन माध्यमांतून अनेक व्यायाम प्रकार शिकवले जातात. अनेक डाएट आणि वर्कआऊट्स सांगितले जातात.  परंतु, ते कशासाठी आणि किती उपयुक्त आहेत, हे कोणीच सांगत नाही. वास्तविक जर तुम्ही वजन कमी करू इच्छित असाल, तर काही व्यायामप्रकार शक्यतो टाळले पाहिजेत. हे व्यायाम प्रकार तुमचे वजन कमी करण्यात प्रभावी ठरत नाहीत.

योगा आणि पिलेट्स

योगा आणि पिलेट्स मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी, रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि शांतता, विश्रांतीसाठी मिळवण्यासाठी फायदेकारक ठरतात. परंतु, वजन कमी करण्यासाठी आपल्याला कार्डिओसह वेटलिफ्टिंग करणे आवश्यक आहे.( Health tips Avoid 5 exercise to burn fat)

कार्डिओ नृत्य वर्ग

झुम्बासारखे कार्डिओ नृत्य व्यायाम  मूड, संतुलन, स्थिरता आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या सुधारण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. परंतु, जेव्हा शरीरावर अतिरिक्त चरबी जमा होते, तेव्हा ते उपयुक्त ठरत नाही. कार्डिओ, झुम्बामध्ये सामील होण्यापेक्षा स्ट्रेंथ ट्रेनिंग घेणे अधिक फायद्याचे ठरते.

बॅरे क्लास

बॅरे क्लासेसमुळे आपल्या शरीरास टोन देता येतो. बॉडी पोश्चर आणि माइंड-बॉडी कनेक्शन सुधारण्यासाठी बॅरे हा व्यायाम चांगला आहे. याने आपल्या हृदयाची गती वाढविण्यासाठी किंवा स्नायूंच्या वाढीस मदत होत नाही. त्यामुळे आपल्या शरीरास टोन देण्यासाठी  बॅरेऐवजी वेट ट्रेनिंग आणि कार्डिओ व्यायाम करण्याचा प्रयत्न करावा. (Health tips Avoid 5 exercise to burn fat)

एबी एक्सरसाइज

फक्त सिट-अप करण्याऐवजी संपूर्ण शरीराचा व्यायाम करण्याचा प्रयत्न करावा. यामुळे वजन कमी होईल तसेच, शरीर टोनही होईल.

एलिप्टिकल

एलिप्टिकल आपल्या हृदयाला बळकट करण्यासाठीचा एक कमी-प्रभावी व्यायाम प्रकार आहे. परंतु, यामुळे आपल्या शरीरावरची चरबी अजिबात बर्न होत नाही. त्यासाठी आपल्याला धावण्याचा व्यायाम करणे गरजेचे आहे

(Health tips Avoid 5 exercise to burn fat).

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.