चपातीला तूप लावून खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? 99% लोकांना माहिती नसेल

अनेकांना रोजच्या जेवणांध्ये तूप हे लागतच. तर काहींना चपातीला तूप लावून खाणे आवडते. पण हे बऱ्याच जणांना माहित नसेल की जर तूप लावून चपाती खाणे हे फक्त चवीसाठी नाही तर आरोग्यासाठी देखील तेवढेच फायदेशीर असते. चपातीवर तूप लावून खाल्ल्याने नक्की काय फायदे मिळतात चला जाणून घेऊयात.

चपातीला तूप लावून खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? 99% लोकांना माहिती नसेल
What are the health benefits of eating chapati with ghee
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 28, 2025 | 3:20 PM

अनेकांना तूप हे फार आवडतं. डाळ-भातावर तूप घालून खायला आवडतं तर काहींनी चपातीला किंवा रोटीला तूप लावून खायला आवडतं. पण तूप-रोटी किंवा चपाती खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने गुणकारी मानलं जातं. आयुर्वेदात तूपाला अमृत म्हटले आहे. आयुर्वेदात चपातीवर तूप लावूण खाण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. आजकाल जेव्हा प्रत्येकजण फिटनेस आणि डाएटिंगचा विचार करताना दिसतो. पण अवनेकांच्या डाएटमध्ये तूप हे असतंच असतं. पण रोज तूप घालून रोटी खाणे खरोखर आरोग्यदायी आहे का? हे जाणून घेऊयात. आपण रोटीवर तूप लावून खाण्याचे फायदे आणि तोटे काय आहेत, तसेच तूप किती खाणे योग्य आहे आणि कोणत्या लोकांनी खाणे ते टाळावे हे जाणून घेऊयात.

तूप आणि चपाती खाल्ल्याने कोणते आजार बरे होतात?

1. पचन सुधारते

तूप पचनसंस्था सुधारते. जेव्हा तुम्ही तुपासोबत रोटी खाता तेव्हा रोटीतील फायबर आणि कार्बोहायड्रेट्स सहज पचतात. त्यामुळे पोट हलके राहते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

2. शरीराला त्वरित ऊर्जा देते

तुपामध्ये असलेले चांगले फॅट्स आणि ओमेगा-3 फॅटी अॅसिड शरीराला त्वरित ऊर्जा देतात. म्हणूनच कधीकाळी शेतकरी आणि मजूर सकाळी तूप लावून भाकरी खाऊन दिवसभर काम करण्याची ताकद मिळवत असत.

3. मेंदू आणि त्वचेसाठी फायदेशीर

तुपामध्ये असलेले जीवनसत्त्वे अ, ड, ई आणि के मेंदूची वाढ, दृष्टी, त्वचेची चमक आणि केसांची ताकद वाढवतात. तुमच्या आहारात त्यांचा समावेश केल्याने तुम्हाला एकाच वेळी एकच नाही तर अनेक फायदे मिळतात.

4. वजन नियंत्रणात उपयुक्त

योग्य प्रमाणात तूप खाल्ल्याने चयापचय वाढते. चयापचय चांगले असताना शरीरात चरबी साठत नाही आणि वजनही नियंत्रणात राहते. योग्य प्रमाणात तूप सेवन केल्यास लठ्ठपणासारख्या समस्या उद्भवत नाहीत.

5. हृदयाचे आरोग्य सुधारते

जर तुम्ही शुद्ध देशी गायीचे तूप खाल्ले तर ते तुमच्या हृदयासाठी फायदेशीर ठरू शकते. त्यात असलेले CLA (कंजुगेटेड लिनोलिक अॅसिड) रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते.

6. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते

तुपामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. नियमित तुपाच्या सेवनाने आजार दूर राहतात आणि शरीर मजबूत होते. यामुळे अनेक आजार शरीरापासून दूर राहतात.

तूप खाताना कोणी आणि काय काळजी घ्यावी? 

1. जर तुमची शारीरिक हालचाल कमी असेल आणि तुम्ही जास्त तूप खाल्ले तर वजन वाढणे निश्चित आहे. तूपात कॅलरीज जास्त असतात ज्यामुळे चरबी वाढते.

2. जास्त तूप खाल्ल्याने रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल वाढू शकते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.

3. मधुमेह आणि रक्तदाबाच्या रुग्णांनी मर्यादित प्रमाणात तूप सेवन करावे, अन्यथा आरोग्याच्या समस्या वाढू शकतात.

4. काही लोकांना दुग्धजन्य पदार्थांची अ‍ॅलर्जी असते. अशा लोकांना तूप खाल्ल्याने पोटात गॅस, अ‍ॅसिडिटी किंवा जुलाब होऊ शकतात.

तूप किती प्रमाणात खावे?

आरोग्य तज्ञांच्या मते, एक निरोगी व्यक्ती दररोज 1 किंवा 2 चमचे म्हणजेच 5 ते 10 ग्रॅम तूप खाऊ शकते. जर तुम्ही जास्त शारीरिक हालचाल करत असाल तर तुम्ही थोडे जास्त प्रमाणात घेऊ शकता, परंतु जर तुम्हाला हृदयविकार, मधुमेह किंवा जास्त वजनाची समस्या असेल तर तूप खाण्याच्या आधी नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.