AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पालिकेने पाडलेला स्टॉल पुन्हा बांधण्यासाठी गेला अन्… मुंबईतील वडापाव विक्रेत्याने गमावला जीव, नेमकं काय घडलं?

मुंबईतील ग्लोबल पॅगोडाजवळ स्टॉल आणि जागेच्या वादातून एका वडापाव विक्रेत्याची निर्घृण हत्या. दशरथ चव्हाण असे मृताचे नाव असून, प्रतिस्पर्धी कुटुंबातील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल. काय आहे नेमका वाद आणि रात्री ११.२० वाजता काय घडलं, वाचा सविस्तर.

पालिकेने पाडलेला स्टॉल पुन्हा बांधण्यासाठी गेला अन्... मुंबईतील वडापाव विक्रेत्याने गमावला जीव, नेमकं काय घडलं?
mumbai vadapav
| Updated on: Dec 14, 2025 | 12:10 PM
Share

मुंबईतील ग्लोबल पॅगोडा-एस्सेल वर्ल्ड जेट्टी रोडजवळ शुक्रवारी रात्री एका वडापाव विक्रेत्याची जागेच्या आणि स्टॉलच्या वादातून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली. गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या मालमत्ता आणि स्टॉलवरील कथित अतिक्रमणाच्या वादातून हे अत्यंत क्रूर कृत्य घडले. दशरथ चव्हाण असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दशरथ चव्हाण हे मुंबईतील पॅगोडाजवळ संस्कार कॅफे नावाचा वडापावचा स्टॉल चालवायचे. काल रात्री ११.२० वाजताच्या सुमारास त्यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यांच्याशी पाच वर्षांपासून तीव्र वाद असलेल्या प्रतिस्पर्धी कुटुंबातील सदस्यांनी हे कृत्य केल्याचा आरोप आहे. दशरथ चव्हाण यांच्या पत्नी संगिता चव्हाण यांनी याबद्दल पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

त्यानुसार, प्रतिस्पर्धी स्टॉल चालवणाऱ्या रोझबर्ड मिरांडा, तिचा पती रोलँड मिरांडा, त्यांची मुलगी रोबिना परेरा, जावई जोबी परेरा आणि त्यांचा चालक पवन शर्मा यांनी दशरथ चव्हाण यांच्यावर हल्ला केला. दशरथ चव्हाण यांनी नुकताच त्यांचा स्टॉल पुन्हा सुरू केल्यानंतर काही वेळातच या सर्वांनी त्यांना घेरले. त्यानंतर चव्हाण यांना खाली पाडून त्यांच्या छातीवर, पोटात, पाठीवर, डोक्यावर आणि तोंडावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. हे सर्व त्यांच्या पत्नी आणि कर्मचाऱ्यांसमोर घडले. पण ते काहीही करू शकले नाहीत. यानंतर चव्हाण यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र मध्यरात्री १२.१८ वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मिरांडा कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल

पोलिसांच्या सूत्रांनुसार, मिरांडा कुटुंबियांनी ग्लोबल पॅगोडा परिसरात खारफुटीची जमीन टाकून सरकारी जागेवर अतिक्रमण केले होते. तसेच या जागेत त्यांनी एक दुकान बांधले होते. चव्हाण यांनी या विरोधात वन विभाग तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे तक्रार केली होती. चव्हाण यांच्या तक्रारीनंतर मिरांडा कुटुंबाचे बांधकाम पाडण्यात आले.

त्यानंतर मिरांडा कुटुंबानेही चव्हाण यांच्या स्टॉलविरुद्ध बीएमसीकडे तक्रार केली. ज्यामुळे काही दिवसांपूर्वी चव्हाण यांचा स्टॉलही पाडण्यात आला. शुक्रवारी रात्री दशरथ चव्हाण आपला पाडलेला स्टॉल पुन्हा बांधण्यासाठी त्या जागेवर परतले असताना मिरांडा कुटुंबाने त्यांच्यावर हल्ला केला, अशी माहिती समोर आली आहे. यानंतर आता याप्रकरणी गोरई पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक महेश निवातकर यांनी मिरांडा कुटुंबातील सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा