AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘गडकरी घाबरलेयत’, नजरकैदेत ठेवल्याचा आरोप, E20 पेट्रोलविरोधातील आंदोलनापूर्वीच तहसीन यांचा मोठा दावा

Tehseen Poonawalla on Nitin Gadkari: तहसीन पुनावाला यांनी रस्ते वाहतूक आणि महामार्ग नितीन गडकरी यांच्यावर मोठी टीका केली. E20 पेट्रोलविरोधात पुनावाला हे उपोषणाला बसणार आहे. त्यापूर्वीच दिल्लीत मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. पोलिसांनी त्यांच्या घरी धडक दिली आहे. काय घडली घडामोड?

'गडकरी घाबरलेयत', नजरकैदेत ठेवल्याचा आरोप, E20 पेट्रोलविरोधातील आंदोलनापूर्वीच तहसीन यांचा मोठा दावा
तहसीन पुनावाला, नितीन गडकरी
| Updated on: Aug 01, 2026 | 2:09 PM
Share

E20 पेट्रोल धोरणाविरोधात तहसीन पुनावाला आंदोलन करणार आहेत. ते उपोषणाला बसणार आहेत. त्याचवेळी दिल्लीत मोठी घडामोड घडली आहे. दिल्ली पोलिसांनी पुनावाला यांना घरातच नजरबंद केले आहे. पुनावाला यांनी काही व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले आहेत. घराच्या जवळपास पोलीस असल्याचे आणि ते घरातून बाहेर पडू देत नसल्याचा त्यांचा दावा आहे. त्यांनी केंद्रीय स्ते वाहतूक आणि महामार्ग नितीन गडकरी यांच्यावर मोठी टीका केली आहे. शनिवारी पुनावाला यांनी एक व्हिडिओ शेअर करत त्यांच्या घरी महिला पोलिसांचा मोठा फौजफाटा आल्याचा दावा केला.

घरातच केले नजरबंद

पुनावाला यांनी एक ट्विट केले आहे. त्यानुसार, दिल्ली पोलिसांनी त्यांना घरातच नजरबंद केले आहे. गडकरी हे इथेनॉल पेट्रोलला विरोध केल्याने घाबरलेले आहेत. तर दुसऱ्या एका व्हिडिओत ते पोलिस अधिकाऱ्यांना जाब विचारत असल्याचे दिसते. कोणतेही कागदपत्र नसताना त्यांना घरातून बाहेर पडण्यास का विरोध करण्यात येत आहे असा सवाल त्यांनी केला. देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या 15 दिवस अगोदरच त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तुमच्या आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते, त्यांनी सहकार्य करावे असे पोलीस अधिकारी या व्हिडिओत म्हणताना दिसत आहेत.

उपोषणाचा दिला इशारा

शुक्रवारी पुनावाला यांनी जाहीर केले होते की ते एकटेच गांधी स्मारकापर्यंत पायी जातील. तिथे ते मूक आंदोलनाला सुरुवात करतील. त्यानंतर ते उपोषणाला सुरुवात करतील. 31 जुलै रोजी पोलिसांनी त्यांच्या प्रस्तावित आंदोलनाला आणि संसदेपर्यंतच्या एकल मोर्चाला परवानगी नाकारली. नीट परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीनंतर कॉक्रोच जनता पार्टीने महिनाभराहून अधिक काळ जंतर मंतरवर आंदोलन केले होते. तत्कालीन शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यानंतर राजीनामा दिला होता. आता पुनावाला यांनी ई20 पेट्रोल धोरणाविरोधात एल्गार पुकारल्याने पोलीस सतर्क झाले आहेत.

ई20 पेट्रोलमध्ये इथेनॉल पॉलिसीनुसार, 80 टक्के पेट्रोल आणि 20 टक्के इथेनॉल मिसळल्या जात आहे. या धोरणाविरोधात विरोधकांनी आणि अनेक वाहतूक संघटनांनी आंदोलनाची हाक दिली आहे. 4 मार्च रोजी दिल्लीतील वाहतूक संघटनांनी संसदेवर मोर्चा काढण्याची हाक दिली आहे. अनेक जुन्या वाहनधारकांनी ई20 पेट्रोलमुळे त्यांच्या वाहनांचा देखभाल खर्च वाढल्याचे आणि मायलेट घटल्याची तक्रार केली आहे. नितीन गडकरी यांनी सुद्धा ई20 पेट्रोलमुळे मायलेज दोन ते सहा टक्क्यांपर्यंत घसरल्याचे मान्य केले आहे. देशात ई20 जनता पार्टी नावाने एक पक्ष ही स्थापन करण्यात आला आहे.

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती