लिपस्टिक’वर असतो तो छोटासा नंबर? जाणून घ्या संपूर्ण अर्थ

लिपस्टिक हा केवळ रंग किंवा सौंदर्यवर्धक घटक नसून त्यामागे गणित आहे. आणि हे गणित कळालं, की तुमची मेकअप शॉपिंग अधिक स्मार्ट होते. म्हणूनच, पुढच्या वेळी लिपस्टिक खरेदी करताना फक्त रंग बघू नका तर त्यावर लिहिलेला नंबर अशा पद्धतीने नक्की लक्षात ठेवा!

लिपस्टिकवर असतो तो छोटासा नंबर? जाणून घ्या संपूर्ण अर्थ
woman and lipstick
| Edited By: | Updated on: Jun 29, 2025 | 1:37 PM

लिपस्टिक ही मेकअपचा एक महत्त्वाचा भाग मानली जाते. ऑफिसला जायचं असो, पार्टीला हजर व्हायचं असो किंवा साधं कुठे फिरायला महिलांचं लूक पूर्ण होतो तो लिपस्टिकनेच. पण तुम्ही कधी लिपस्टिकच्या खालच्या भागावर असलेला छोटासा नंबर पाहिला आहे का? तो नंबर तसाच नुसता नाही, त्यामागे एक खास कारण असतं. जे तुम्हाला ही माहिती नसेल तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा

लिपस्टिकवरचा नंबर म्हणजे काय?

‘115’, ‘M12’, ‘07’ असे नंबर लिपस्टिकवर लिहिलेले असतात. लखनऊच्या प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट अमरीश कौर सांगतात की, हा नंबर म्हणजे त्या शेडचा किंवा फॉर्म्युलाचा खास कोड असतो. म्हणजेच, तुम्हाला ज्या रंगाची लिपस्टिक आवडते, तोच शेड पुन्हा शोधायचा असेल, तर नंबर पाहून तुम्ही सहज तीच लिपस्टिक परत विकत घेऊ शकता.

नाव असूनसुद्धा का असतो नंबर?

कधी लिपस्टिकवर “Ruby Woo 707” किंवा “MR 22” असं लिहिलेलं दिसतं. असं का? कारण एकाच नावाच्या लिपस्टिक वेगवेगळ्या ब्रँड्समध्ये मिळू शकतात. पण नंबर मात्र प्रत्येक ब्रँडमध्ये वेगळा असतो. त्यामुळे तुमचा आवडता शेड तुम्ही कोणत्याही ब्रँडमध्ये त्या नंबरवरून ओळखू शकता.

ऑनलाइन खरेदी करताना काय लक्षात ठेवाल?

जेव्हा आपण ऑनलाइन लिपस्टिक खरेदी करतो, तेव्हा फोटोत दिसणारा रंग आणि प्रत्यक्षात मिळणारा रंग वेगळा असतो. त्यामुळे फोटोवर विश्वास न ठेवता शेड नंबर पाहून खरेदी करणं जास्त योग्य ठरतं. नंबर मुळे तुम्हाला अगदी हवे तसाच रंग मिळतो.

पूर्वीचा शेड परत हवंय?

अनेक वेळा असं होतं की, एखादा शेड आपल्याला खूप आवडतो, पण नंतर त्याचं नाव लक्षात येत नाही. अशा वेळी शेड नंबर लक्षात ठेवलेला असेल तर तीच लिपस्टिक तुम्ही पुन्हा सहज शोधू शकता.

ब्रँड्ससाठी युनिक ओळख

हा नंबर केवळ ग्राहकांसाठीच नव्हे, तर ब्रँडसाठीही एक ओळख असतो. काही ब्रँड्स तर शेडसोबतच त्याच्या फॉर्म्युलाही नंबरवरून सांगतात. त्यामुळे त्याच शेडमध्ये वेगळं फिनिश (जसं मॅट, क्रीम) हवं असेल तरी ते नंबरवरून कळतं.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)