AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्री रेल्वेमध्ये सगळे प्रवासी झोपलेले असतात, तेव्हा ड्रायव्हर आपापसात काय बोलतात माहितीये? 99% लोकांना माहित नसेल

रात्रीच्या शांततेत जेव्हा ट्रेन धावत असते, तेव्हा सर्वत्र अंधार असतो, प्रवासी गाढ झोपेत असतात तेव्हा लोको पायलट आणि सहाय्यक लोको पायलट हे  दोघेही नक्की काय बोलत असतील असा विचार कधीतरी आपल्या मनात येऊन गेला असेलच. पण याचं उत्तर 99टक्के लोकांना माहित नाही. चला जाणून घेऊयात.

रात्री रेल्वेमध्ये सगळे प्रवासी झोपलेले असतात, तेव्हा ड्रायव्हर आपापसात काय बोलतात माहितीये? 99% लोकांना माहित नसेल
What Do Train Drivers Talk About at Night?Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 09, 2025 | 2:31 PM
Share

आपण सर्वजनच रेल्वेने प्रवास करतो. रेल्वेमध्ये असणारे करोडो लोक हा प्रवास अगदीच सुरक्षित समजतात. एवढंच नाही तर रात्री देखील अगदी बिनधास्त झोपतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की रात्रभर सर्व प्रवासी झोपलेले असताना ड्रायव्हर एकमेकांशी काय बोलत असतील. किंवा त्यांना झोप येत नसले का असे अनेक प्रश्न आपल्याला कधीना कधी तर पडलेच असतील. आणि याची उत्तरे 99 टक्के लोकांना माहित नसतील. चला जाणून घेऊयात.

 दोन्ही रेल्वे चालक नक्की काय करत असतात?

रात्री जेव्हा ट्रेनमध्ये प्रवास करणारे बहुतेक प्रवासी आरामात झोपलेले असतात, तेव्हा ट्रेन चालवणारे दोन्ही रेल्वे चालक, म्हणजेच लोको पायलट आणि असिस्टंट लोको पायलट, हे जागेच असतात. ते सतत एकमेकांशी बोलत राहतात.

लोको पायलट आणि सहाय्यक लोको पायलट नक्की काय बोलत असतात?

रात्रीच्या शांततेत जेव्हा ट्रेन धावत असते, तेव्हा सर्वत्र अंधार असतो, प्रवासी गाढ झोपेत असतात. अचानक, जेव्हा दुसरी ट्रेन जवळून जाते तेव्हा तिचा आवाज येतो किंवा जेव्हा ट्रेन स्टेशनवर थांबते तेव्हा त्या स्टेशनवरचा गोंधळ, अन्साउटमेंट ऐकू येते. अशा वातावरणातही, ड्रायव्हरच्या केबिनमध्ये क्षणभरही शांतता नसते. होय , दोन्ही ड्रायव्हर हे सतत बोलत असतात.लोको पायलट आणि सहाय्यक लोको पायलट दोघेही वेळोवेळी एकमेकांशी बोलत राहतात. या संभाषणाचे कारण केवळ निरर्थक गप्पा मारणे नाही तर ते कर्तव्याचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे.

हे संभाषण का आवश्यक असते?

रेल्वे बोर्डाचे माजी सदस्य प्रदीप कुमार यांनी एकदा सांगितलं होतं की, रेल्वे मार्गांवर सिग्नल सहसा एक ते दोन किलोमीटर अंतरावर बसवले जातात. तथापि, काही संवेदनशील विभागांमध्ये हे अंतर 500 ते 800 मीटरपर्यंत कमी करण्यात आले आहे.ज्या स्थानकांवर किंवा जंक्शनवर ट्रेनचा वेग कमी असतो, तिथे सिग्नल अंतर आणखी कमी ठेवले जाते, 200 ते 500 मीटरपर्यंत, कारण त्या ठिकाणी ट्रेन नियंत्रित करणे तुलनेने कठीण असते.

असं असतं संभाषण अन् विषय

प्रदीप कुमार यांनी असेही स्पष्ट केले आहे की प्रत्येक सिग्नलला एक क्रमांक असतो. जेव्हा ट्रेन सिग्नल पास करते तेव्हा लोको पायलट सिग्नल नंबर मोठ्याने म्हणतो. तो सिग्नलचा रंग देखील सांगतो (उदा. लाल, पिवळा, हिरवा). यानंतर, सहाय्यक लोको पायलट माहिती योग्यरित्या समजली आहे याची खात्री करण्यासाठी नंबर आणि रंग पुन्हा सांगतो.

उदाहरणार्थ, जर सिग्नल 1050 क्रमांकाचा असेल आणि तो हिरवा असेल, तर लोको पायलट मोठ्याने म्हणतो, “सिग्नल 1050, हिरवा” सहाय्यक पायलट पुन्हा म्हणतो, “सिग्नल 1050, हिरवा.” अशाप्रकारे, ट्रेनची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी दोघांमधील संवाद रात्रभर सुरुच असतो.

प्रवाशांची आणि ट्रेनची सुरक्षितता याबाबत रेल्वे चालकाचे संभाषण काय असते

प्रत्येक ड्युटीपूर्वी, लोको पायलटला संपूर्ण मार्गाचा नकाशा मिळतो. या नकाशामध्ये ट्रेन कोणत्या मार्गावर जाईल, ती कुठे थांबेल, किती वेळ थांबावी लागेल, वळण कुठे आहे, कोणत्या भागात ती किती वेगाने चालवावी लागेल, कोणत्या शहरात येईल आणि कोणती खबरदारी घ्यावी लागेल याची माहिती असते. ड्रायव्हर या मार्गानुसार आणि नकाशानुसारच ट्रेन चालवतो, जेणेकरून कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही. या संपूर्ण प्रक्रियेचा उद्देश कोणत्याही परिस्थितीत प्रवाशांची आणि ट्रेनची सुरक्षितता हाच असतो.

त्यामुळे रेल्वेच्या लोको पायलट आणि सहाय्यक लोको पायलट हे दोघेही रात्री मार्गावर आणि नकाशावर लक्ष ठेवून सिग्नल आणि इतर प्रवासादरम्यानच्या महत्त्वाच्या गोष्टींवरच ते बोलत असतात.

काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?.