मेकअप काढण्यासाठी वापरा या गोष्टी, होणार नाही त्वचा खराब!

| Updated on: Jun 02, 2023 | 5:30 PM

तुम्हाला माहित आहे का की तुम्ही घरात असलेल्या काही गोष्टी वापरून तुमचा मेकअप देखील काढून टाकू शकता. आज आम्ही तुम्हाला सांगतो की मेकअप काढण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टी वापरू शकता?

मेकअप काढण्यासाठी वापरा या गोष्टी, होणार नाही त्वचा खराब!
Makeup removal
Follow us on

मुंबई: सुंदर दिसण्यासाठी लोक मेकअप करतात. मेकअप लावल्याने चेहरा बहरतो, पण मेकअप नीट न काढल्यास तुमच्या त्वचेचे नुकसान होते. त्यामुळे झोपण्यापूर्वी मेकअप काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो. पण तुम्हाला माहित आहे का की तुम्ही घरात असलेल्या काही गोष्टी वापरून तुमचा मेकअप देखील काढून टाकू शकता. आज आम्ही तुम्हाला सांगतो की मेकअप काढण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टी वापरू शकता?

अशा प्रकारे काढून टाका मेकअप

कोरफड

कोरफडच्या फायद्यांविषयी सर्वांनाच माहिती आहे. यात असलेले घटक आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर असतात. त्यामुळे मेकअप काढण्यासाठी तुम्ही कोरफड जेलचा वापर करू शकता. हे लावण्यासाठी चेहऱ्यावर कोरफड जेल लावून हलक्या हातांनी मसाज करा, असे केल्याने मेकअप सहज दूर होईल आणि त्वचेचे नुकसान होणार नाही.

खोबरेल तेल

नारळ तेल एक उत्तम नैसर्गिक मेकअप रिमूव्हर आहे, याचे कारण असे आहे की नारळ तेलात फॅटी ॲसिड असतात जे त्वचेच्या आत जातात आणि त्वचेला मॉइश्चरायझ करतात. दुसरीकडे नारळाच्या तेलाने मेकअप काढल्यास चेहऱ्यावर मुरुमांची समस्या उद्भवत नाही. मेकअप काढून टाकण्यासाठी कॉटन पॅडमध्ये थोडं नारळाचं तेल घेऊन हलक्या हातांनी चेहऱ्यावर लावा.

ऑलिव्ह ऑइल

मेकअप काढण्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑइलची मदत घेऊ शकता. मेकअप काढण्यासाठी तुम्ही कॉटनमध्ये ऑलिव्ह घ्या आणि त्याच्या मदतीने मेकअप काढा

(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)