गहू, ज्वारी की बाजरी; आरोग्यासाठी कोणते जास्त फायदेशीर आहे?

प्रत्येकाच्या घरात गव्हाची चपाती,ज्वारी-बाजरीची भाकरी खाल्ली जाते. अनेकांना तर चपतीशिवाय जेवणही करत नाही. पण आरोग्यासाठी मात्र गहू, ज्वारी आणि बाजरी यापैकी कोणते धान्य आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असते. तसेच पोटाच्या समस्या असणाऱ्यांनी यापैकी कशाचे सेवन करु नये? हे सर्व जाणून घेऊयात.

गहू, ज्वारी की बाजरी; आरोग्यासाठी कोणते जास्त फायदेशीर आहे?
Which of these, wheat, jowar or millet, is more beneficial for health?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 09, 2025 | 5:42 PM

जवळजवळ प्रत्येक घरात गव्हाची चपाती, रोटी किंवा फुलके खाल्ले जातात. तर काही घरांमध्ये काहीजण ज्वारीच्या भाकरी किंवा बाजरीच्या भाकरी खातात. या रोट्यांचे, भाकऱ्यांचे आरोग्यासाठी अनोखे फायदे आहेत. यामुळे प्रश्न निर्माण होतो की या तिन्हीपैकी कोणती चपाती किंवा भाकरी आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर असते.शरीरासाठी गहू, ज्वारी कि बाजरी नक्की काय फायदेशीर अन् आरोग्यदायी असतं जाणून घेऊयात.

गव्हाची चपाती

गव्हाची चपाती, रोटी किंवा फुलके ही साधारणपणे प्रत्येक घरात खाल्ली जाते. गव्हाच्या चपात्यांमध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, फायबर आणि व्हिटॅमिन बी सारखे पोषक घटक असतात, जे आरोग्याला फायदेच देतात. गव्हाची चपाती शरीराला ऊर्जा प्रदान करते. पण ही गव्हाची चपाती आरोग्यासाठी जेवढी फायदेशीर असते तेवढीच ती काहींसाठी नुकसानकारकही असते. जसं की, ग्लूटेन इनटॉलरेंस, गॅस किंवा पोटाच्या समस्या असलेल्या लोकांनी गव्हाची चपाती खाणे टाळले पाहिजे. यामुळे गॅस आणि बद्धकोष्ठता होऊ शकते.

ज्वारीची भाकरी

अनेक घरात ज्वारीची भाकरी अतिशय आवडीने खाल्ली जाते. ज्वारी ग्लूटेन-मुक्त असते आणि आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते. त्यात फायबर, लोह, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे सर्व आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. मधुमेहींसाठी त्याचे सेवन विशेषतः फायदेशीर मानले जाते. हे फायबरचा एक उत्कृष्ट स्रोत देखील आहे, जे तुम्हाला जास्त काळ पोट भरलेले ठेवण्यास मदत करते. त्यामुळे वारंवार खाण्याची इच्छा होत नाही. तसेच वजन कमी करण्यास मदत करते.

बाजरीची भाकरी

हिवाळ्याच्या काळात बाजरीचे सेवन आरोग्यासाठी विशेषतः फायदेशीर मानले जाते. मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि फायबर सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध असलेली बाजरी हृदय आणि हाडांसाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते. त्याचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात आणि स्ट्रोकचा धोकाही कमी होतो.

त्यामुळे ज्यांना पोटाचे आजार आहे त्यांनी तर गव्हाची चपाती, रोटी नक्कीच खाण्याचं प्रमाण कमी ठेवले पाहिजे किंवा टाळले पाहिजे. तसेच त्यांनी डॉक्टारांचा सल्लाही घेतला पाहिजे.