मटणाचा कोणता भाग सर्वाधिक पौष्टिक असतो? 99 टक्के लोकांना नाही माहीत

नॉनव्हेज प्रेमी मंडळींसाठी मटण हा सर्वात जास्त जिव्हाळ्याचा विषय असतो, मात्र तुम्हाला हे माहीत आहे का? की मटणात सर्वात जास्त पौष्टिक भाग कोणता असतो, तज्ज्ञ काय सांगतात?

मटणाचा कोणता भाग सर्वाधिक पौष्टिक असतो? 99 टक्के लोकांना नाही माहीत
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 09, 2025 | 7:53 PM

नॉनव्हेज प्रेमिंसाठी मटण म्हणजे जणू जीव की प्राण असाच विषय असतो. मांसहारामध्ये अंडी, चिकन आणि मटण या तीन प्रमुख गोष्टींचा समावेश होतो. अंडी आणि चिकन हे प्रमुख्यानं कोंबडीशी संबंधित पदार्थ आहेत. तर मटणामध्ये बोकड आणि मेंढ्यांचं मांस याचा समावेश होतो. मटण हे रेड मीटच्या प्रकारात येत असल्यानं त्याला तांत्रिकदृष्ट्या मटण असं म्हणतात. मटण हा जीवनसत्वे आणि प्रथिनांचा खजानाच असतो. मात्र जे मांसहार करतात त्यांना अनेकदा असा प्रश्न पडतो की मटणाचा कोणता भाग हा सर्वाधिक पौष्टिक आणि आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचा असतो?

तंज्ज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार एका शंभर ग्राम मटणामध्ये 33 ग्राम प्रोटीन असते, याचा अर्थ तुम्ही जर दररोज 100 ग्राम मटण खाल्लं तर तर त्यातून तुमची दैनंदिन प्रोटीनची गरज 60 टक्क्यांपर्यंत पूर्ण होऊ शकते. जे व्यक्ती मांसहार करत नाहीत अशा व्यक्तींमध्ये सर्वसामान्यपणे बी 12 या जीवनसत्त्वाची कमतरता दिसून येते, मात्र जो व्यक्ती नियमितपणे मटनाचं सेवन करतो त्या व्यक्तीमध्ये बी 12 हे जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात अढळून येते, कारण मटण हा प्रथिनांसोबतच बी12 सारख्या अनेक जीवनसत्त्वाचा प्रमुख स्त्रोत आहे. जो व्यक्ती मटण खातो किंवा मांसहार करतो, त्या व्यक्तीला जीवनसत्त्वासाठी विशेष काही प्रयत्न करण्याची गरज नसते. एका 100 ग्रॅम मटणात 234 कॅलरी इतकी ऊर्जा असते, सोबतच 33 ग्रॅम प्रथिने, 4.7 ग्रॅम लोह, 109 ग्रॅम कोलेस्टॉल, इतर घटक असतात.

आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मटणाचा कोणता भाग हा सर्वाधिक पौष्टिक आणि आरोग्यासाठी फायद्याचा असतो, त्याबद्दल जाणून घेऊयात, तुम्ही जेव्हा बाजारात मटण घेण्यासाठी जाता तेव्हा सर्वातआधी त्या बोकडाचं वय लक्षात घ्या पौष्टिकतेच्या दृष्टीकोणातून फारच वय कमी असलेला किंवा जास्त वय असलेलं बोकड हे योग्य नसतं, तर तज्ज्ञांच्या मते मध्यम वय असलेलं आणि सरासरी आठ ते दहा किलो वजन असलेलं बोकड हे उत्तम असतं. तसेच हाडे व मांसांचं प्रमाण हे योग्य प्रमाणात ठेवावं हे प्रमाण 70: 30 ठेवावं बोकडाचे पुढचे पाय, घसा, बरगडी, लिव्हर आणि छाती हे जे अवयव असतात ते सर्वात जास्त पौष्टिक असतात असं तज्ज्ञ सांगतात.