AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पांढरा राइस की ब्राऊन राइस… डायबिटीजचे रुग्ण कोणता भात खाऊ शकतात? अन् कोणत्या भातामुळे शुगर वाढू शकते?

मधुमेहाच्या रुग्णांसाठी भात हा निषिद्ध मानला जातो. कारण भातामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते असे म्हटले जाते. त्यासाठी मधुमेहाच्या रुग्णांना भात खाण्यास मनाई केली जाते. भातामध्ये सामान्यत: दोन प्रकार खाल्ले जातात ते म्हणजे पांढरा भात आणि ब्राऊन राइस. यांपैकी कोणता भात डायबिटीजचे रुग्ण खाऊ शकतात? हे जाणून घेऊयात.

पांढरा राइस की ब्राऊन राइस... डायबिटीजचे रुग्ण कोणता भात खाऊ शकतात? अन् कोणत्या भातामुळे शुगर वाढू शकते?
White rice or brown riceImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 14, 2025 | 11:31 PM
Share

आताच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे डायबिटीज होणे अगदीच सामान्य झालं आहे. पण हा आजार तेवढाच गंभीरही होत चालला आहे. डायबिटीजच्या रुग्णांना अनेक पथ्य पाळावी लागतात. अनेक पदार्थ आणि पेये टाळावी लागतात. पण बऱ्याच डायबिटीजच्या रुग्णांना जेवताना भात खाण्याचा मोह मात्र आवरत नाही. पण भात हा नक्कीच डायबिटीजच्या रुग्णांसाठी धोकादायका मानला जातो. कारण त्यामुळे शुगर वाढण्याची शक्यता असते. पण भातातही दोन प्रकार असतात पांढरा आणि ब्राऊन राइस. यांपैकी कोणता भात डायबिटीजचे रुग्ण खाऊ शकतात? हे जाऊन घेऊयात.

पांढरा कि ब्राऊन राइस

मधुमेहाच्या वाढत्या धोक्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी जागतिक मधुमेह दिन साजरा केला जातो. भारतात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे आणि याचे एक प्रमुख कारण म्हणजे खराब आहार आणि जीवनशैली. आपण आपल्या दैनंदिन आहारात वापरत असलेल्या भाताकडे लक्ष देणे विशेषतः महत्त्वाचे आहे.

पांढरा तांदूळ 

शक्यतो भारतीय घरांमध्ये पांढऱ्या तांदळाचा भात खाल्ला जातो. डायबिटीज असलेल्या लोकांसाठी पांढरा भात सामान्यतः निषिद्ध असतो. कारण पांढऱ्या भातामुळे शुगर वाढते असे म्हटले जाते. पण यामागे नेमकं काय सत्य आहे हे जाणून घेऊयात.

पांढरा भात खरंच टाळला पाहिजे का?

तज्ज्ञांच्या मते, पांढरा तांदूळ किंवा पॉलिश केलेला तांदूळ यामध्ये फायबर आणि पोषक तत्वांचे प्रमाण कमी असते. ते तयार करताना, बाहेरील आवरण म्हणजे कोंडा काढून टाकला जातो. फक्त स्टार्च शिल्लक राहतो.

डायबिटीजच्या रुग्णांसाठी पांढरा भात नुकसानकारक का आहे?

कारण या तांदळामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो. पांढरा भात लवकर पचतो त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढवते. सतत पांढरा भात खाण्यामुळे इन्सुलिन प्रतिरोध वाढू शकतो.

ब्राऊन राइस का चांगला आहे?

ब्राऊन राइस किंवा पॉलिश न केलेला तांदूळ, त्याचा कोंडा आणि जर्म लेयर टिकवून ठेवतो, ज्यामध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. म्हणून, मधुमेहींसाठी ते खाणे फारसं नुकसानकारक नसते. ज्यामुळे डायबिटीजच्या रुग्णांसाठी ब्राऊन राइस एक चांगला पर्याय आहे.

डायबिटीजच्या रुग्णांसाठी ब्राऊन राइस चांगला पर्याय का ठरू शकतो?

ब्राऊन राइसमध्ये जीआय पांढऱ्या तांदळापेक्षा कमी असतो. हा भात हळूहळू पचतो ज्यामुळे रक्तातील साखर स्थिर राहते. यामध्ये असलेले मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.

भात किती आणि कसा खावा?

तज्ज्ञांच्या मते, जर मधुमेहाच्या रुग्णांना हवे असेल तर ते त्यांच्या आहारात ब्राऊन राइस समाविष्ट करू शकतात. परंतु त्यांनी ब्राऊन राइस देखील जास्त प्रमाणात सेवन करू नये.

या चुका करू नका

फक्त ब्राऊन राइसवर अवलंबून राहू नका, तर तुमच्या आहारात विविध पदार्थ देखील समाविष्ट करा. तळलेले पदार्थ किंवा तुपात शिजवलेले पदार्थ खाणे टाळा. रात्री जास्त प्रमाणात भात खाल्ल्याने साखरेची पातळी वाढू शकते, म्हणून रात्री भात खाणे टाळा किंवा कमी प्रमाणात खा.

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.