
‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतील मराठमोळी अभिनेत्री प्रिया मराठचे वयाच्या 38व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले आहे. कर्करोगाचे नाव ऐकताच प्रत्येकजण घाबरतात. हा इतका धोकादायक आजार आहे की जर त्याचे वेळीच निदान झाले नाही तर अनेकांचा जीव जाऊ शकतो. कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत आणि ते शरीराच्या विविध अवयवांवर हल्ला करतात, त्यांना प्रभावित करतात आणि तुम्हाला कमकुवत करतात. त्यामुळे कर्करोगाची लक्षणे जितक्या लवकर ओळखली जातील, तितके उपचार यशस्वी होऊ शकतात. आजकाल कर्करोगाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. कमी वयाचे लोकही या धोकादायक आजाराच्या विळख्यात येत आहेत. कोणते कर्करोग अधिक धोकादायक आहेत आणि कोणत्या वयाचे लोक याच्या जाळ्यात सापडत आहेत, हे जाणून घेऊया…
कोणत्या कर्करोगांची लक्षणे वाढत आहेत?
आजकाल 50 वर्षांखालील लोकांमध्ये कर्करोगाची लक्षणे वाढत आहेत. विशेषतः स्तनाचा कर्करोग, लिम्फोमा आणि कोलन (आतड्याचा) कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये जास्त वाढ दिसून येत आहे. याशिवाय, टेस्टिक्युलर, किडनी आणि स्वादुपिंडाच्या कर्करोगाची प्रकरणेही वाढत आहेत, परंतु ही प्रकरणे अद्याप कमी आहेत.
कर्करोगाची कारणे काय आहेत?
कर्करोग होण्याचे नेमके कारण अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही, परंतु तज्ज्ञ यावर सतत संशोधन करत आहेत. जर कोणाला दीर्घकाळ थकवा, अचानक वजन कमी होणे, दीर्घकाळ टिकणारी सूज, शरीराच्या कोणत्याही भागात गाठ, सतत दुखणे किंवा रक्तस्त्राव यांसारखी लक्षणे दिसली, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. कारण ही लक्षणे कर्करोगाचे संकेत असू शकतात.
आतड्यांशी संबंधित समस्या कोलन कर्करोगाचे महत्त्वपूर्ण संकेत असू शकतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या पोटात किंवा संडासच्या सवयींमध्ये काही विचित्र बदल होतात, जसे की मलाचा रंग काळा होणे किंवा त्यात रक्त दिसणे, ही चिंताजनक लक्षणे असू शकतात. गेल्या दशकात अमेरिका आणि जगभरात कोलन कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की ही वाढ पर्यावरणीय आणि खाण्यापिण्याच्या बदलांशी संबंधित असू शकते. तरीही, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
वजन कमी होण्याकडेही दुर्लक्ष करू नका
जर एखाद्या व्यक्तीचे वजन कोणत्याही कारणाशिवाय अचानक कमी होऊ लागले, तर ही चिंतेची बाब असू शकते. यासोबतच थकवा जाणवणे किंवा झोपेच्या पद्धतीत बदल होणे ही अशी लक्षणे आहेत, ज्याकडे दुर्लक्ष करू नये. ही लक्षणे सामान्यतः गंभीर आजाराची नसतात, परंतु काहीवेळा ती कर्करोगासारख्या आजाराची सुरुवात असू शकतात. जर तुमचे वजन कोणत्याही प्रयत्नाशिवाय कमी होत असेल किंवा भूक लागत नसेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
ही लक्षणेही कर्करोगाकडे निर्देश करतात