
उन्हाळ्याच्या तडाख्यामुळे एसीचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. विशेषतः मे-जूनच्या उन्हाळ्यात तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर गेले की एसीशिवाय घरात राहणं कठीण वाटतं. अशा वेळी अनेकजण एसी खरेदी करतात, पण एसी खरेदी करताना आणि तो बसवताना काही महत्त्वाच्या बाबी दुर्लक्षित केल्या जातात. विशेषतः विन्डो एसी नेहमीच खिडकीजवळ किंवा खाली का बसवतात आणि स्प्लिट एसी मात्र भिंतीवर उंचावर का बसवतात, हा प्रश्न अनेकांना पडतो. यामागे फक्त डिझाइन नाही, तर शास्त्रीय आणि व्यावहारिक कारणंही आहेत.
आज बाजारात दोन प्रकारचे एसी अधिक लोकप्रिय आहेत – विन्डो एसी आणि स्प्लिट एसी. दोन्ही प्रकार खोली थंड करत असले तरी त्यांची कार्यपद्धती, रचना आणि बसवण्याची पद्धत वेगळी आहे.
स्प्लिट एसीचा इंडोर युनिट भिंतीवर उंचावर बसवण्याची काही महत्त्वाची कारणं आहेत:
विन्डो एसी भिंतीच्या खालच्या भागात किंवा खिडकीजवळ बसवण्याची कारणंही तितकीच शास्त्रीय आहेत:
विन्डो एसी आणि स्प्लिट एसी यांच्यात रचनेपासून कार्यक्षमतेपर्यंत अनेक महत्त्वाचे फरक आहेत. विन्डो एसी हे एकाच युनिटमध्ये असतं, तर स्प्लिट एसी दोन स्वतंत्र युनिट्समध्ये विभागलेलं असतं एक घरात (इंडोर) आणि दुसरं घराबाहेर (आउटडोर). स्प्लिट एसीचं डिझाइन आधुनिक असून, त्याचा आवाज खूपच कमी असतो, त्यामुळे ते घरात शांतता राखणारं पर्याय ठरतं. स्प्लिट एसी भिंतीवर कुठेही बसवता येतं, तर विन्डो एसी बसवण्यासाठी खिडकी आवश्यक असते. किंमतीच्या बाबतीत विन्डो एसी तुलनेत अधिक स्वस्त असतो, त्यामुळे बजेट मर्यादेमुळे अनेकजण त्याला प्राधान्य देतात. मात्र, मोठ्या खोल्यांमध्ये स्प्लिट एसी अधिक प्रभावी ठरतो, कारण त्याची थंड हवा खोलीत समान रीतीने पसरते; तर विन्डो एसी लहान खोलीसाठी अधिक योग्य मानला जातो. यामुळे ग्राहकांनी आपली गरज, जागा आणि बजेट लक्षात घेऊन एसीची निवड करावी.