Pudina For Face : पिंपल्स करायचे आहेत दूर ? अहो मग पुदिन्याची पानं वापरून पहा ना…

चेहऱ्यावरील मुरूम, पिंपल्स हे कोणलाच नकोसे वाटतात, तुम्हालाही त्यांचा त्रास होत आहे का ? तसं असेल तर पुदिन्याच्या पानांचा वापर तुमच्यासाठी गुणकारी ठरू शकतो. कसा काय विचारता ? हे जरूर वाचा...

Pudina For Face : पिंपल्स करायचे आहेत दूर ? अहो मग पुदिन्याची पानं वापरून पहा ना...
Image Credit source: freepik
| Updated on: Jul 19, 2023 | 12:44 PM

Pudina For Face : पुदीन्याचा प्रभाव (mint) हा थंड असतो. त्याचा वापर केल्यास तो शरीराला थंड (coolness) ठेवण्याचे काम करतो. त्यामुळे तुम्हीच अनेक पदार्थ, चटण्यांमध्येही पुदीन्याचा वापर करू शकता. लस्सी, मठ्ठा , चटणी अशा अनेक पदार्थांत पुदीना वापरता येतो. पुदीन्याच्या पानांमध्ये सॅलिसिलीक ॲसिड असते. जे आपली त्वचा स्वच्छ करून हेल्दी व निरोगी (skin care) ठेवण्याचेही काम करतो.

आजकाल बहुतांश लोकांना चेहऱ्यावर ॲक्ने, पिंपल्सचा त्रास होतो. अशा परिस्थितीत पुदीन्याच्या पानांचा वापर केला तर ते त्वचेसाठी खूपच फायदेशीर ठरू शकतं. पुदिन्यामुळे त्वचा मुलायमही राहते. मुरुमांच्या समस्येला तोंड देण्यासाठी पुदिन्याच्या पानांचा वापर कसा करावा ते जाणून घेऊया.

पुदीन्याची पाने वापरा

तुम्ही त्वचेसाठी केवळ पुदिन्याची पानेही वापरू शकता. त्यासाठी ही पाने स्वच्छ धूवून त्याची पेस्ट तयार करावी आणि ती पेस्ट मान, तसेच चेहऱ्यावर लावून वाळेपर्यंत ठेवावी. सुकल्यानंतर ही पेस्ट काढून टाकावी आणि चेहरा स्वच्छ धुवावा. हा उपाय तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा करू शकता.

पुदीना व तुळस

मुरुमांचा सामना करण्यासाठी, ती घालवण्यासाठी पुदिन्याची पाने आणि तुळशीची पाने वापरू शकता. पुदिना आणि तुळशीची पाने स्वच्छ धुवावीत व त्यामध्ये थोडे पाणी घालून ती मिक्सरमधून बारीक करून पेस्ट बनवावी. ही पेस्ट चेहऱ्यावर वीस मिनिटे राहू द्यावी. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा.

पुदीना व लिंबाचा रस

स्वच्छ धुतलेली पुदीन्याची पाने मिक्सरच्या भांड्यात ठेवून त्यात थोडा लिंबाचा रस आणि गरजेनुसार पाणी घालून फिरवून घ्यावे. आता ही तयार झालेली पेस्ट चेहऱ्यावर लावून मसाज करावा. 15 ते 20 मिनिटांनी पेस्ट वाळल्यावर चेहरा साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. मुरूमांचा किंवा पिंपल्सचा त्रास दूर करण्यासाठी हा अतिशय उत्तम उपाय आहे

पुदीना व मध

पुदिन्याची पाने व पाणी घालून पेस्ट तयार करा. त्यात थोडास मध घालून एक फेसपॅक तयार करा व तो चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. 20 ते 25 मिनिटानंतर तो वाळला असेल तर साध्या पाण्याने चेहरा व मान स्वच्छ धुवा. नियमित वापराने फरक दिसून येईल.

पुदीना आणि ग्रीन टी

एक कप ग्रीन टी तयार करा व तो थंड होऊ द्या. तोपर्यंत पुदीन्याच्या पानांची पेस्ट तायर करा. त्यामध्ये गार झालेला ग्रीन टी घाला व नीट एकत्र करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावून ठेवावे. वाळल्यानंतर धुवून टाकावे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)