१५ फूट उंचीची गणपती मूर्ती मंडपात नेताना कोसळली, धारावीत खळबळ

धारावी, व्ही. बी. नगर प्रेमनगर येथील बैलबाजारातील ओम शक्ती फाऊंडेशनजवळ १५ फूट उंचीची गणेश मूर्ती खाली कोसळल्याने परिसरात तणाव पसरला आहे.

१५ फूट उंचीची गणपती मूर्ती मंडपात नेताना कोसळली, धारावीत खळबळ
dharavi news
| Updated on: Sep 08, 2026 | 11:09 PM

१५ फूट उंचीची गणपती मूर्ती कारखान्यातून मंडपात आणताना स्पीड ब्रेकरवरुन मुर्तीची ट्रॉली ओढताना अपघात होऊन ही गणेश मूर्ती कोसळल्याची घटना धारावी परिसरात घडली आहे. धारावीतल ओम शक्ती फाऊंडेशन, प्रेम नगर, व्ही. बी.नगर येथील बैल बाजार येथून १५ फूट उंचीची गणेश मूर्ती खाली कोसळल्याने परिसरात तणाव पसरल्याची घटना घडली आहे.

धारातील बैलबाजार परिसरात गणेश मूर्ती घेऊन जाणारी ट्रॉली स्पीड ब्रेकरवरून ओढत असताना, शीतल तलावाजवळ अचानक गणेश मूर्ती ट्रॉलीवरून खाली कोसळल्याची घटना घडली आहे. त्यानंतर पोलिस बंदोबस्तात गणेश मूर्तीचे शीतल तलावात विसर्जन करण्यात आलं आहे.या घटनेत ट्रॉलीजवळ असलेल्या एका व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली आहे. या व्यक्तीला भाभा रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले आहेत. या प्रकरणात शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी प्रशासनाला जबाबदार धरले आहे.

भुलेश्वर येथील भुलेश्वरच्या महाराजाला आणताना नुकतीच मोठी दुर्घटना घडली होती. या २२ फूटांच्या भव्य मूर्तीला भायखळा ते भुलेश्वर येथे नेताना ही मूर्ती एका बाजूला कलंडल्याने पाच जण जखमी झाले तर त्यातील दोघांचा मृ्त्यू झाला होता. ही घटना मंडपात आणताना अवघ्या ५०-६० मीटर आधी घडली आहे. या ठिकाणी रस्त्यावर कोणतेही खड्डे दिसत नसून प्राथमिक तपासानुसार, तोल गेल्यामुळे ही घटना घडली असावी असे म्हटले जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us