मोठी बातमी! समृद्धीवर 19 गाड्यांचा जागेवर चुराडा, बाजुलाच राजेश टोपेंची गाडी, धडाधड… काय घडलं?

Samruddhi Mahamarg Accident, Rajesh Tope : समृद्धी महामार्गावर बुलढाण्यातील दुसरबीडजवळ 18 वाहनांचा भीषण साखळी अपघात झाला. भरधाव कंटेनरने रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनाला धडक दिल्यानंतर एकापाठोपाठ एक वाहने आदळली. यावेळी माजी मंत्री राजेश टोपे हे तिथेच होते. त्यांनी या अपघाताबद्दलची भयावह माहिती दिली.

मोठी बातमी! समृद्धीवर 19 गाड्यांचा जागेवर चुराडा, बाजुलाच राजेश टोपेंची गाडी, धडाधड... काय घडलं?
Samruddhi Mahamarg Accident, Rajesh Tope
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 13, 2026 | 6:26 PM

गणेश सोळंकी, टीव्ही९ मराठी, प्रतिनिधी : बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर आज 18 ते 19 वाहनांचा भीषण अपघात झाला असून ही वाहने साखळी पद्धतीने ऐकमेकांवर धडकल्याने हा अपघात झाला. यामध्ये अनेक वाहनाचा चुराडा झाला असून वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. तर वाहनात बसलेले 15 प्रवाशी गंभीर जखमी झाले असून 20 प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. अपघात झाल्यावर समृद्धी महामार्ग प्रशासनानं तत्काळ मदत कार्य सुरू करून वाहनात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. दरम्याने वाहतूक सुरळीत करण्यात आलीय. दरम्यान, माजी मंत्री आणि शरद पवार पक्षाचे नेते राजेश टोपे यांची गाडीही अपघातस्थळी उभी होती. त्यांनी या अपघाताचा थरारक प्रसंग सांगितला आहे.

नेमकं घटना कशी घडली?

आज सकाळी साधारण साडे दहा दरम्यान सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड जवळ ही घटना घडली असून अपघातग्रस्त सिमेंट मिक्सर वाहन बाजूला काढण्याचे काम सुरू होते. यावेळी महामार्गावरून जाणारी वाहतूक काही काळ रस्त्यावरच थांबवण्यात आली होती. मात्र समृद्धीवरून भरधाव धावणारे एका कंटेनर ने उभ्या वाहनाला धडक दिल्याने वाहने एकमेकावर आदळली आणि अपघात झाला. अपघातात लहान मुले सुद्धा जखमी झाली आहे. यावेळी मदत करणाऱ्यांनी वाहनात अडकलेला लोकांना बाहेर काढले. मात्र या अपघातात जीवितहानी झाली नाही, ही विशेष. सध्या दिवाळीच्या सुट्या असल्याने आणि अनेक जण गावी जात असल्याने समृद्धी मार्गावर वाहनाची मोठी गर्दी झालेली आहे.

Loading...

माजी मंत्री राजेश टोपे यांनी सांगितला समृद्धी अपघातातला प्रसंग

नागपूर या ठिकाणी मी लग्न समारंभासाठी गेलो होतो, मात्र परतीचा प्रवास करत असताना साधारण साडेदहा अकरा वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला. एक मिक्सरची ट्रॉली पलटी झालेली होती आणि त्या ट्रॉलीमुळे मुंबईकडे जाणारा रोड ब्लॉक झालेला होता, भरपूर गाड्या लाईन मध्ये थांबलेल्या होत्या. मात्र त्याचवेळी पाठीमागून भरावेगात आलेला एक स्टीलचा ट्रक, त्या चालकाला ते ट्रक अजिबात कंट्रोल झालं नाही म्हणून त्याने मागच्या सगळ्या गाड्यांना धडक दिल्या. महत्त्वाचं म्हणजे माझी गाडी ज्या ठिकाणी उभा होती, त्याच्या अगदी बाजूलाच उभ्या असलेल्या गाडीला पाठीमागून धडक दिली आणि थांबली, अशी प्रतिक्रिया राजेश टोपेंनी दिली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us