AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune : इन्स्टाग्रामवरील मैत्रीने आयुष्य उद्धवस्थ, विद्यार्थिनीवर सलग 1 वर्ष चाैघांकडून अत्याचार, पुण्यात खळबळ, व्हिडीओ तयार करत..

Pune Crime News : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ज्याने थेट खळबळ उडाली आहे. एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर सलग 1 वर्ष लैगिंक अत्याचार करण्यात आला. इन्स्टाग्रामवरील मैत्री विद्यार्थिनीला महागात पडली आहे.

Pune : इन्स्टाग्रामवरील मैत्रीने आयुष्य उद्धवस्थ, विद्यार्थिनीवर सलग 1 वर्ष चाैघांकडून अत्याचार, पुण्यात खळबळ, व्हिडीओ तयार करत..
Pune News
| Updated on: Jul 21, 2026 | 8:27 AM
Share

पुण्यातून एक धक्कादायक घटना पुढे येत आहे. चक्क एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर सलग एक वर्ष अत्याचार करण्यात आला. पुणे पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. गेल्या वर्षभरात बीएच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या 21 वर्षीय विद्यार्थिनीचे वारंवार लैंगिक शोषण केल्याचा आरोप तिने केला. या घटनेने मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हे दाखल केली आहेत. आरोपींनी इन्स्टाग्रामवरील मैत्रीचा गैरफायदा घेतला. यासोबतच अत्याचार करताना तिचे काही व्हिडीओ तयार केले. पीडितेला गप्प बसवण्यासाठी तिचा अश्लील व्हिडिओ उघड करण्याची धमकी दिली. अखेर या पीडित विद्यार्थिनीने एक वर्ष अत्याचार सहन केल्यानंतर थेट पोलिसात धाव घेतली. इन्स्टाग्रामवरील मैत्री मोठी महागात पडल्याचे यावरून दिसत आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून लैगिंक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच आता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

पुण्यात महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर लैगिंक अत्याचार 

धक्कादायक बाब म्हणजे 4 जणांकडून विद्यार्थिनी लैगिंक अत्याचार केला जात होता. अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी तिला दिली जात होती. अखेर या अत्याचाराला कंटाळून तिने वाघोली पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी 4 जणांविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील विमाननगर परिसरात ही विद्यार्थिनी राहण्यास होती.

इन्स्टाग्रामवरील मैत्रीचा गैरफायदा 

2025 मध्ये तिचे पुण्यातील नामांकित कॉलेजमध्ये तिचा प्रवेश झाला. यादरम्यानच तिची आरोपीशी ओळख झाली. त्यानंतर त्यांची ओळख मैत्रीमध्ये बदलली. याचाच गैरफायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. पोलिसांनी विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर चारही आरोपींना ताब्यात घेतले. विद्यार्थिनीने दिलेल्या माहितीनुसार, या चारही जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला.

विद्यार्थिनीचे व्हिडीओ व्हायरल करण्याची थेट धमकी 

विद्यार्थिनीचे काही व्हिडीओ देखील यांनी शूट केली, ज्यावरून तिला सातत्याने धमकावले जात होते. या चारही आरोपींनी तिच्यावर लैगिंक अत्याचार केला. चाैघेही तिला घेऊन जात होते. विद्यार्थिनीच्या आरोपांनंतर विविध चर्चांना उधाण आले. या प्रकरणात पोलिस अधिकचा तपास करत आहेत. आरोपींना कोर्टात हजर केले जाईल.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...