शहापुरात बर्ड फ्ल्यूचे थैमान, 300 कोंबड्यांचा तडफडून मृत्यू; चिकन खवय्ये घाबरले

| Updated on: Feb 18, 2022 | 7:57 AM

शहापूर तालुक्यातील वेहळोली येथील मुक्तजीवन सोसायटीमध्ये एक पोल्ट्रीफार्म आहे. तिथल्या कोंबड्या अनेक दिवसांपासून तडफडून मरत असल्याचे पोल्ट्रीफार्म मालकाच्या लक्षात आले. अनेक कोंबड्या वारंवार मरत असल्याने त्यांची सुध्दा धास्ती वाढली.

शहापुरात बर्ड फ्ल्यूचे थैमान, 300 कोंबड्यांचा तडफडून मृत्यू; चिकन खवय्ये घाबरले
बर्ड फ्लूचा
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई – कोरोनाच्या (corona) आजाराने मागील दोन वर्षात थैमान घातले, त्यात अनेकांचा बळी गेल्याचे पाहायला मिळाले, तर आजही अनेकांना जीव गमवावा लागत असल्याचं चित्र देशात आहे. अशा परिस्थितीत दुस-या एखाद्या आजाराने डोकेवरती काढायला सुरूवात केली की, अनेकांचे धाब दणाणले असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकत्याच शहापूर (shahapur) शहरात कोंबड्या तडफडून मरत असल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर मेलेल्या अनेक कोंबड्याची तपासणी केली. आलेल्या अहवालात 300 कोंबड्यांना बर्ड फ्ल्यू (bird flu) झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे परिसरात मोठी घबराहट पसरली आहे. कारण कोरोनाचा प्रादुर्भाव नुकताच कुठे तरी कमी व्हायला लागला असताना बर्ड फ्ल्यूने डोकेवरती काढल्याने अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. हा प्रकार शहापूर तालुक्यातील वेहळोली येथील आहे. तिथल्या पोल्ट्रीमधील 300 कोंबड्यांचा तडफडून मृत्यू झाला आहे.

300 कोंबड्याचा तडफडून मृत्यू झाल्यानंतर तपासणी 

शहापूर तालुक्यातील वेहळोली येथील मुक्तजीवन सोसायटीमध्ये एक पोल्ट्रीफार्म आहे. तिथल्या कोंबड्या अनेक दिवसांपासून तडफडून मरत असल्याचे पोल्ट्रीफार्म मालकाच्या लक्षात आले. अनेक कोंबड्या वारंवार मरत असल्याने त्यांची सुध्दा धास्ती वाढली. तब्बल तीनशे कोंबड्या मेल्यानंतर त्यांनी पशुसंवर्धन विभागाला ही माहिती दिली. त्यांनी तात्काळ कोबड्यांची तपासणी केली. तपासणीत कोंबड्या बर्ड फ्ल्यूने मेल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे, त्यानंतर जवळच्या परिसरात बाधीत झालेल्या कोंबड्या नष्ठ करण्याचं काम सूरू आहे. कारण अनेक कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूची बाधा झाली आहे. हे पोल्ट्री फार्म मुक्ती सोसायटीचे आहेत. तसेच तिथं बदकांचे आणि देशी कोंबड्या देखील अधिक दगावल्या आहेत.

मेसेजवरती विश्वास ठेऊ नका

बर्ड फ्ल्यूच झालेले सगळे पक्षी पोल्ट्रीपासून लांब एक किलोमीटर अंतरावरती असून त्यांना नष्ठ करण्याचे काम सुरू आहे. तसेच परिसरातील चिकन विक्रेत्यांची दुकाने तिथली वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश ठाणे जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणा-या मॅसेजवरती कोणीही विश्वास ठेऊ नका असं आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आले आहे. बर्ड फ्ल्यूचं निदान झाल्यानंतर पशुसंवर्धन विभागाच्या अधिका-यांनी तात्काळ परिसरात धाव घेतली आणि तिथून अधिक प्रसार होणार नाही याची काळजी घेतली आहे. सध्या तिथं पशुसंवर्धन विभागातील 70 कर्मचारी काम करीत आहेत. परिसरात अधिक घबराहट पसरली आहे. कारण तिथं अधिक मेसेज व्हायरल झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नका असं आवाहन पशुसंवर्धन विभागाने केलं आहे.

सोलापूर : पाचपैकी तीन नगरपंचायतींवर मोहिते पाटील गटाची सत्ता, नगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात?

CCTV | धावत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न जीवावर, मुंबईत रेल्वे कर्मचाऱ्याचा धडकून मृत्यू

सनी लिओनीची ऑनलाईन फसवणूक, पॅनकार्डवर घेतलं कर्ज, सिबील स्कोर खराब