CCTV | धावत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न जीवावर, मुंबईत रेल्वे कर्मचाऱ्याचा धडकून मृत्यू

मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकावरुन निजामुद्दीन एक्स्प्रेसने ते बोरिवलीला आले. बोरिवली येथे आल्यानंतर ते चालत्या ट्रेनमधून खाली उतरण्याचा प्रयत्न करत होते, मात्र त्यांचा हात ट्रेनच्या दांड्यावरुन सुटला नाही. त्यामुळे ते ट्रेनला धडकले

CCTV | धावत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न जीवावर, मुंबईत रेल्वे कर्मचाऱ्याचा धडकून मृत्यू
धावत्या रेल्वेतून उतरताना पडून एकाचा मृत्यू
Follow us
| Updated on: Feb 18, 2022 | 7:31 AM

मुंबई : धावत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न एकाच्या जीवावर बेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चालत्या ट्रेनमधून (Running Train) उतरण्याच्या नादात रेल्वे कर्मचाऱ्यालाच जीव गमवावा लागला. मुंबईतील बोरिवली रेल्वे स्थानकावर ही घटना (Railway Accident) घडल्याचं उघडकीस आलं आहे. चालत्या ट्रेनमधून उतरणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याचा पडून मृत्यू झाला. वांद्रे येथून निजामुद्दीन एक्स्प्रेसने बोरिवलीला येत असताना हा अपघात घडला. बोरिवली जीआरपीकडून मिळालेल्या माहितीनुसार ही घटना बुधवारी घडली. या घटनेचं सीसीटीव्ही फूटेज (CCTV Footage) समोर आलं असून त्यामध्ये रेल्वे कर्मचारी ट्रेनमधून पडतानाचा अंगावर काटा आणणारा क्षण कैद झाला आहे.

काय आहे प्रकरण?

धावत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करताना रेल्वे कर्मचाऱ्यालाच प्राण गमवावा लागल्याची घटना समोर आली आहे. संबंधित व्यक्ती मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकावरुन निजामुद्दीन एक्स्प्रेसने बोरिवलीला आली. बोरिवली येथे आल्यानंतर ते चालत्या ट्रेनमधून खाली उतरण्याचा प्रयत्न करत होते, मात्र त्यांचा हात ट्रेनच्या दांड्यावरुन सुटला नाही. त्यामुळे ते ट्रेनला धडकले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

नेमकं काय घडलं?

बोरिवली रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना बुधवारी घडली. या घटनेचं सीसीटीव्ही फूटेज समोर आलं आहे. बोरिवली रेल्वे स्थानकावर संबंधित कर्मचारी ट्रेनमधून उतरत असताना पडल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

रेल्वेच्या आवाहनाकडे प्रवाशांचं दुर्लक्ष

रेल्वे पोलीस प्रवाशांना चालत्या ट्रेनमध्ये चढू नका किंवा चालत्या ट्रेनमधून खाली उतरु नका, असं आवाहन वारंवार करत असतात. चालत्या ट्रेनमधून चढणे आणि उतरणे जीवघेणे ठरु शकते. गेल्या काही दिवसात अशाप्रकारे अनेक अपघात घडल्याचं पाहायला मिळत आहे.

काही वेळा प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेले रेल्वे पोलीस किंव सहप्रवासी अपघातग्रस्तांचे प्राण वाचवत असल्याचंही पाहायला मिळतं. पण प्रत्येक वेळी प्रत्येकाला योग्य ती मदत मिळेलच, तुम्ही नशीबवान असालच, असं नाही.

वेगात असलेल्या गाडीत चढता-उतरताना काही जण हलगर्जी करतात आणि त्यांना आपला जीव गमवावा लागतो. रेल्वेप्रमाणेच आम्ही तुम्हालाही आवाहन करु इच्छितो की, कृपया चालत्या ट्रेनमध्ये चढू नका किंवा चालत्या ट्रेनमधून खाली उतरण्याचा प्रयत्न करु नका.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

चालत्या ट्रेनमधून पळून जाणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पकडले, थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

भजे घेण्यासाठी रेल्वेतून उतरला खाली अन् ट्रेन सुरु झाली! पुढे जे घडलं ते चांगलंच अंगलट आलं…

Mumbai Video | धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न, टीसीने वाचवला प्रवाशाचा प्राण, थरार सीसीटीव्हीत कैद

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.