चालत्या ट्रेनमधून पळून जाणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पकडले, थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

महिलेच्या ओरडण्याचा आवाज ऐकताच पोलीस हवालदार देशपांडे त्या चोराच्या मागे धावले. रेल्वे रुळावर चोराचा पाठलाग करीत अखेर देशपांडे यांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. देशपांडे यांच्या धाडसी कृत्याची घटना रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

चालत्या ट्रेनमधून पळून जाणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पकडले, थरारक घटना सीसीटीव्हीत कैद
चालत्या ट्रेनमधून पळून जाणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पकडले


मुंबई : लोकलमध्ये महिलेचा मोबाईल हिसकावून चालत्या ट्रेनमधून उडी मारुन पळून जाणाऱ्या चोरट्याला पोलिसाने फिल्मी स्टाईलने पाठलाग करुन पकडल्याची घटना दहिसर रेल्वे स्थानकावर घडली आहे. श्रीकांत देशपांडे असे या पोलिसाचे नाव आहे. देशपांडे हे दहिसर पोलीस ठाण्यात तैनात आहेत. देशपांडे यांचा थरारक पाठलाग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

ड्युटी संपवून घरी चालले होते पोलीस

दहिसर पोलीस ठाण्यात तैनात असलेले पोलीस हवालदार श्रीकांत देशपांडे यांच्या 8 नोव्हेंबर रोजी आपली ड्युटी संपवून घरी चालले होते. यासाठी ते लोकल पकडण्यासाठी दहिसर रेल्वे स्थानकावर आले. देशपांडे हे घरी जाण्यासाठी लोकल पकडत होते तेवढ्यात समोरुन येणाऱ्या चालत्या ट्रेनमधून एका मुलाने उडी मारल्याचे त्यांनी पाहिले. ट्रेनमधून उडी मारुन हा मुलगा रेल्वे रुळाच्या दिशेने पळू लागला. तेवढ्यात एक महिला डब्याच्या दरवाज्याजवळ येऊन चोर चोर अशी ओरडू लागली.

पोलिसाचे धाडसी कृत्य सीसीटीव्हीमध्ये कैद

महिलेच्या ओरडण्याचा आवाज ऐकताच पोलीस हवालदार देशपांडे त्या चोराच्या मागे धावले. रेल्वे रुळावर चोराचा पाठलाग करीत अखेर देशपांडे यांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. देशपांडे यांच्या धाडसी कृत्याची घटना रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. श्रीकांत देशपांडे यांनी आरोपीला पकडून बोरिवली जीआरपीच्या ताब्यात दिले. आरोपी महिलेचा मोबाईल हिसकावून चालत्या ट्रेनमधून पळून जात असल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र पोलीस हवालदार श्रीकांत देशपांडे यांनी जीवाची पर्वा न करता रेल्वे रुळावरून पळत आरोपीला पकडल्याने त्यांचे कौतुक होत आहे. (The thief was caught by the police in a filmy style in dahisar railway station)

इतर बातम्या

महाधिवक्त्याशी बोलेन, पण तुम्ही संप मागे घ्या; अनिल परब यांचं एसटी कामगारांना पुन्हा आवाहन

आर्यनप्रकरणातही फर्जीवाडा उघड, वानखेडेंना निलंबित करा; नवाब मलिक यांची मागणी

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI