
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याने यावरुन राज्यात सध्या संतापाचं वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील याबाबत माफी मागितली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून एक आरोपी फरार आहे. अटक केलेल्या आरोपी चेतन पाटीलला आज कोर्टात हजर केले. सरकारी वकिलांनी आरोपीच्या चौकशीसाठी पोलीस कोठडीची मागणी केली. यावेळी सुनावणी दरम्यान आरोपीचे वकील तुषार पाटील यांनी देखील कोर्टात बाजू मांडली.
कोर्ट – नाव सांगा
चेतन पाटील
कोर्ट – पोलिसांनी मारहाण केली का?
चेतन – नाही
पोलीस – कसे काम केले याचा पुरावा गोळा करायचा आहे. या माध्ये अन्य कोणी होतं का याची तपास करायचा आहे.
सरकारी वकील – पुतळा पडला असता तर एखाद्या पर्यटकाचा जीव गेला असता. बांधकाम कसे केले? पर्यावरणाचा अभ्यास केला का? याची माहिती घ्यायची आहे.
आरोपीचे वकील – आरोपी शिकलेला असून सगळ्या बाजू स्पष्ट झाल्या आहेत. त्यामुळ पोलीस कोठडीची आवश्यकता नाही. तसेच या प्रकरणात आरोपीचा प्रत्यक्ष सहभाग नाही. जी घटना घडली त्यात त्याचा प्रत्यक्ष सहभागं नाही.
सरकारी वकील – आरोपी सोबत आणखी कोणाची आर्थिक देवाणघेवाण झाली नाही का? लॅपटॉप जप्त करायचा आहे. दोन आरोपी आहेत पैकी एक अद्याप फरार आहे. त्याचा शोध सुरु आहे. दोन दिवसांत जे राडे झाले त्याची चकशी करायची आहे. त्यात आरोपीने काम कसे केले यांचा अहवाल देखील द्यायचा आहे. त्यासाठी दहा दिवस पोलीस कोठाडीची मागणी करत आहोत.
आरोपीचे वकील – अटक चुकीची असून पुतळा का पाडला याचे कारण पोलिसांकडे नाही. ज्यामुळे घटना घडली त्याच्यावर गुन्हा दाखल करणे योग्य होते. त्यामुळे अटक चुकीची आहे. पुतळा का पाडला याचे कारण पोलिसांकडे नाही. पोलिसांकडे कुठला पुरावा नाही. खोटी माहिती आधारे गुन्हा दाखल करण्यात आलाय. चबुतरा ok आहे. आरोपीचे काम चबुतरा बांधणे एवढेच होते. ते नीट आहे. आरोपीचे पुतळा पडावे असा हेतू नाही. 307 का दाखल केला? पुतळा का पडला याचे उत्तर शोधावे ? यासाठी कुठल्या एक्स्पर्टचा अहवाल नाही. जनतेचा प्रक्षोभ कमी करण्यासाठी माझ्या अशिलावर गुन्हा दाखल करण्यात आला. सर्व कागद pwd कडे. मूर्तीमधील धातू गंजले होते का? रिझन क्लियर नाही. ipc मध्ये एक प्रकारे थट्टा आहे. कारण सार्वजनिक मालमततेचे नुकसान कसे झाले हे या गुन्ह्यात बसत का? नुकसान करणे हा आशिलाचा हेतू नव्हता, तर 20 aug ला pwd ने लोकांकडून माहिती घेण्यात आली आणि फक्त मेल केला गेला. एफआयआर अशी केली आहे कि ती बोगस आहे त्यामुळे पोलीस कस्टडीची गरज नाही.
वरील सर्व गोष्टी मान्य केल्या तरी सादर गुन्ह्यातील पाहिजे असलेला दुसरा आरोपी फरार असल्याने त्याचा शोध आणि तपासाची माहिती मिळविण्यासाठी आरोपीची पोलीस कस्टडी मिळावी.
कोर्ट – पाच दिवसाची पोलीस कस्टडी.