AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार, सुनेत्रा पवार आणि रोहित पवारांना क्लीनचीट, ती फाईल अखेर बंद, निकाल काय?

शिखर बँक घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनेत्रा पवार आणि रोहित पवार यांना विशेष न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने सादर केलेला क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने मंजूर केला आहे.

अजित पवार, सुनेत्रा पवार आणि रोहित पवारांना क्लीनचीट, ती फाईल अखेर बंद, निकाल काय?
ajit pawar sunetra pawar rohit pawar
| Updated on: Mar 17, 2026 | 8:04 AM
Share

राज्याचे दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि आमदार रोहित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार, सुनेत्रा पवार आणि रोहित पवारांना क्लीनचीट देण्यात आली आहे. शिखर बँक घोटाळ्याची फाईल बंद करण्यात आली आहे. शिखर बँकेचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयाकडून मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे पवार कुटुंबाला दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSCB) कथित २५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी ७० हून अधिक माजी संचालकांवर आरोप करण्यात आले होते. यात राज्याचे दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि आमदार रोहित पवार यांचा समावेश होता. याप्रकरणी तपास यंत्रणेला ठोस फौजदारी पुरावे न मिळाल्याने न्यायालयाने फाईल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) या प्रकरणात सादर केलेला ‘सी-समरी’ (Closer Report) अधिकृतपणे स्वीकारला आहे. या निर्णयामुळे पवार कुटुंबासह संबंधित सर्व नेत्यांना कायदेशीर प्रक्रियेतून पूर्णतः क्लीनचीट मिळाली असून, गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या राजकीय आणि कायदेशीर वादाला आता पूर्णविराम मिळाला आहे.

नेमके प्रकरण काय?

२०११-१२ च्या सुमारास शिखर बँकेने राज्यातील अनेक सहकारी साखर कारखान्यांना नियमबाह्य कर्जवाटप केल्याचा आरोप करण्यात आला होता. हे कारखाने डबघाईला आल्यानंतर अत्यंत कमी किमतीत विकले गेले, ज्यामुळे बँकेचे सुमारे २५ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले, असा दावा करण्यात आला होता. या प्रकरणात अजित पवार यांच्यासह ७० हून अधिक माजी संचालकांवर ठपका ठेवण्यात आला होता.

न्यायालयाने काय म्हटलं?

मुंबई पोलिसांनी या प्रकरणी दुसऱ्यांदा क्लोजर रिपोर्ट (C-Summary) दाखल केला होता, ज्यावर निकाल देताना विशेष न्यायालयाने मोठे निरीक्षण नोंदवले. न्यायालयाने स्पष्ट केले की, संबंधित संचालकांच्या कृतीमध्ये कोणतीही बेईमानी किंवा लबाडीचा हेतू दिसून येत नाही. तसेच, बँकेच्या संचालकांमध्ये कोणतेही बेकायदेशीर कृत्य करण्यासाठी पूर्वनियोजित कट किंवा संगनमत झाल्याचे ठोस पुरावे तपास यंत्रणेला सापडलेले नाहीत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

राजकीय आणि कायदेशीर परिणाम

विशेष न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेचा हा अहवाल स्वीकारल्यामुळे आता हे प्रकरण अधिकृतपणे बंद झाले आहे. आर्थिक गुन्हे शाखेने क्लीनचीट दिल्यानंतर, या प्रकरणाशी संबंधित असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) चौकशीतही आता मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राज्याच्या राजकारणात गाजलेल्या या प्रकरणाला आता पूर्णविराम मिळाला आहे.

Follow Us
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा..
Mumbai Cha Raja | हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा हार, व्हिडीओ होतोय व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल