नाशिक येथे धरणात आंघोळीला गेलेल्या बाप आणि दोन चिमुकल्या लेकींचा बुडून मृत्यू

नाशिक येथे धरणात आंघोळीसाठी गेलेल्या बापलेकींचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी शिवारात ही घटना घडली आहे.

नाशिक येथे धरणात आंघोळीला गेलेल्या बाप आणि दोन चिमुकल्या लेकींचा बुडून मृत्यू
Nashik
| Updated on: Nov 11, 2026 | 5:16 PM

नाशिक येथील बेझे धरणात आंघोळीसाठी गेलेल्या वडील आणि दोन मुलींचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी शिवारात ही घटना घडली आहे. बेझे धरणाच्या लगत राहत असलेल्या एका कुटुंबाकडे दिवाळी सणानिमित्त पाहुणे म्हणून आलेली मंडळी धरणात आंघोळीसाठी गेली होती. त्यावेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने वडील आणि दोन लहान लेकींचा बुडून मृत्यू झाला आहे.

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी शिवारात बेझे धरणाच्या लगत राहात असलेल्या उत्तम चव्हाण यांच्याकडे पाहुणे म्हणून आलेले एकाच कुटुंबातील तीन जण आंघोळीसाठी गेले होते. आंघोळीसाठी ते धरणाच्या पाण्यात उतरले असताना त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही आणि दोन्ही मुलींसह वडील पाण्यात बुडाले. सुरेश नामदेव भोर (वय ४२ वर्ष), ज्योती सुरेश भोर (वय १० वर्ष )आणि हर्षदा सुरेश भोर (वय ७ वर्ष) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
या घटनेनंतर परिसरात शोककळा पसली आहे.

Loading...

बेझे धरणात सकाळी आंघोळीसाठी सुरेश नामदेव भोर ( ४२ ) आपल्या दोन चिमुकल्या लेकींसह गेले होते. त्यावेळी त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही, तिघांचाही बुडून मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. या वेळी त्यांना वाचवण्याच्या प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी, अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास त्रंबकेश्वर पोलीस करत आहेत.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us