Latur Crime : परळीच्या चोराची पुण्यापर्यंत मजल, 19 मोटारसायकली चोरणारा अखेर लातूरमध्ये जेरबंद

मोटारसायकल चोरी करायची आणि मिळेल त्या किंमतीमध्ये विक्री करायची. यामधून लाखो रुपये कमवण्याचा कहर परळी येथील 35 वर्षीय अखिल शेख याने केला होता. केवळ बीड जिल्हाच नव्हे तर मराठवाड्यातील प्रत्येत जिल्ह्यातून शेख याने मोटारसायकलीची चोरी केली होती. एवढेच नाही तर पुण्यापर्यंत त्याची मजल गेली होती. यामुळे दुचाकीवाल्यांचे तर नुकसान झालेच पण पोलीस प्रशासनही त्रस्त झाले होते.

Latur Crime : परळीच्या चोराची पुण्यापर्यंत मजल, 19 मोटारसायकली चोरणारा अखेर लातूरमध्ये जेरबंद
मराठवाड्यासह पुण्यामध्ये मोटारसायकली चोरी करणारा चोर लातूर पोलिसांकडून जेरबंदImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 04, 2022 | 10:13 AM

लातूर :  (Two Wheeler Theft) मोटारसायकल चोरी करायची आणि मिळेल त्या किंमतीमध्ये विक्री करायची. यामधून लाखो रुपये कमवण्याचा कहर (Parali) परळी येथील 35 वर्षीय अखिल शेख याने केला होता. केवळ बीड जिल्हाच नव्हे तर मराठवाड्यातील प्रत्येत जिल्ह्यातून शेख याने मोटारसायकलीची चोरी केली होती. एवढेच नाही तर पुण्यापर्यंत त्याची मजल गेली होती. यामुळे दुचाकीवाल्यांचे तर नुकसान झालेच पण पोलीस प्रशासनही त्रस्त झाले होते. अखेर (Latur Police) लातूर येथील विवेकानंद चौकच्या पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या असून त्याला अटक करण्यात आली आहे. चोरीच्या 19 मोटरसायकलसह आरोपीस अटक करुन 3 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

असा लागला प्रकरणाचा छडा

विवेकानंद चौक येथे लातूर येथे 28 मार्च रोजी एक मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचे तपासकामासाठी एक पथक रवाना करण्यात आले होते.चोरीस गेलेल्या मोटरसायकलचा शोध घेत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून अखिल महबूब शेख याला पोलिसांनी शाम नगर परिसरातून ताब्यात घेतले होते. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी एम. आय.टी. कॉलेज पार्किंगमध्ये लावलेली स्प्लेंडर मोटर सायकल चोरी केल्याचे कबूल केले होते. एवढेच नाही तर यापूर्वी मराठवाडा आणि पुण्यातही मोटारसायकल चोरी केल्याचे त्याने कबूल केले आहे.

मिळेल त्या किंमतीमध्ये दुचाकीची विक्री

अखिल महेबूब शेख या आरोपीकडे सखोल तपास केला असता त्याने लातूर शहर, उदगीर, माळाकोळी, अंबाजोगाई, बीड, औरंगाबाद, उस्मानाबाद, शिक्रापूर, पुणे येथील विविध ठिकाणाहून मोटरसायकल चोरी केल्याचे सांगून त्यांने चोरलेल्या मोटारसायकली पैकी 19 मोटारसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत. मात्र, चोरी केलेल्या मोटारसायकलची कागदपत्रे नसल्याने मिळेल त्या किंमतीमध्ये त्याने विक्री केलेली आहे. त्याच्याकडून 3 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. विवेकानंद चौक येथील पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात हा तपास करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

Nagpur Crime | 17 वर्षीय मुलगी पाच महिन्यांची गर्भवती, युट्यूबवर व्हिडीओ पाहून गर्भपात!

छावा संघटनेच्या जिल्हाध्यक्षांचा पुतण्या बेपत्ता, अल्पवयीन मुलाचा रविवार रात्रीपासून शोध सुरु

Nashik Murder | बाजारात गेलेला नवरा परतलाच नाही, दुसऱ्या दिवशी रस्त्यात मृतदेह आढळला

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.