सांगलीत बैलगाडी शर्यतीदरम्यान पाय घसरून पडला अन, क्षणात ऊठून धावला, शर्यतीच्या बैलाचा थरारक व्हिडीओ

| Updated on: Jun 06, 2022 | 3:42 PM

बैलगाडी हाकनाऱ्याने एका बैलाचा पाय घसरला हे पाहून दुसऱ्या बैलाची वेसण ओढत त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला तोवर एका क्षणातच पडलेल्या बैलाने उठून पुन्हा दौड मारली. बैल घसरून पडलेला आणि लगेच उठून पुन्हा त्या बैलाने दौड ठोकल्याने ही घटना पाहणाऱ्या बैलप्रेमींनी टाळ्या आणि शिट्टी वाजवत बैलाचे कौतुक केले.

सांगलीत बैलगाडी शर्यतीदरम्यान पाय घसरून पडला अन, क्षणात ऊठून धावला, शर्यतीच्या बैलाचा थरारक व्हिडीओ
bullock cart race
Image Credit source: TV9
Follow us on

सांगली- सर्वोच्च न्यायालयांने बैलगाडा शर्यतीवरील(bullock cart race) बंदी उठल्यानंतर राज्यात ठीकठिकाणी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जात आहेत. बैलगाडा शर्तीमध्ये अनेकदा अपघात घडल्याचे घटनाही घडल्या आहेत. अशीच एक घटना कवठेमहांकाळमधील(Kavthemahankal) कुकटोळी गावामध्ये (Village)बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. शौकिनांच्या उपस्थितीत बैलगाडा शर्यत सुरू झाली. शर्यतीचा थरार रंगला अन अचानक शर्यत सुरु असताना एका बैल पाय घसरून पडला अन पुन्हा क्षणात ऊठून धावू लागला.ल घसरून पडलेला आणि लगेच उठून पुन्हा त्या बैलाने दौड ठोकल्याने ही घटना पाहणाऱ्या बैलप्रेमींनी टाळ्या आणि शिट्टी वाजवत बैलाचे कौतुक केले.

नेमकं काय घडलं

कवठेमहांकाळमधील कुकटोळी गावामध्ये बैलगाडाप्रेमींचा शौकिनांच्या उपस्थितीत बैलगाडी शर्यतीचा थरार रंगला हजारो बैलगाडी शर्यती शौकिनांच्या उपस्थितीत बैलगाडी शर्यतीचा थरार रंगला. या शर्यतीवेळी एका बैल पाय घसरून पडला अन पुन्हा क्षणात ऊठून धावला. शर्यत सूटल्यानंतर काही वेळातच एका बैलजोडीतील एका बैलाचा पाय पळतानाच घसरला. तो बैल जवळपास चारही पायावर पडला. बैलगाडी हाकनाऱ्याने एका बैलाचा पाय घसरला हे पाहून दुसऱ्या बैलाची वेसण ओढत त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला तोवर एका क्षणातच पडलेल्या बैलाने उठून पुन्हा दौड मारली. बैल घसरून पडलेला आणि लगेच
उठून पुन्हा त्या बैलाने दौड ठोकल्याने ही घटना पाहणाऱ्या बैलप्रेमींनी टाळ्या आणि शिट्टी वाजवत बैलाचे कौतुक केले.

बैलांचे हाल होवू नये

मात्र या घटनेमुळे शर्यतीच्या बैलांचे शर्यती दरम्यान हाल होतात क? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शर्यतीच्यादरम्यान अतिउत्साही प्रेक्षकांच्या किंकाळ्या , किंचाळणे यामुळे बैल बुझतात साहाजिकच यामुळे शर्यतीवरील लक्ष विचलित होते. त्यामुळे यासारखे अपघात घडतात. सुदैवाने या अपघातात बैलाला कोणत्याही प्रकारची जखम झालेली नाही. मात्र शर्यती आयोजित केल्या जात असताना बैलांचा छळ होणार नाही याची काळजी घेणं आवश्यक असल्याचे समोर आले आहे.

हे सुद्धा वाचा