गोदिंयामधील देवरीमध्ये महिला चोरांचा सुळसुळाट, पोलिसांनी ट्रॅप लावत असं पकडलं

गोंदियामधील देवरी तालुक्या मध्ये दागिने चोरी होण्याच्या घटना वाढत आहे. याआधी पाच महिलांना चोरी करताना रंगेहाथ पकडलं होतं. अशाच प्रकारची घटना पुन्हा समोर आलीये.

गोदिंयामधील देवरीमध्ये महिला चोरांचा सुळसुळाट, पोलिसांनी ट्रॅप लावत असं पकडलं
| Edited By: | Updated on: Aug 31, 2023 | 10:57 AM

शाहिद पठाण, गोंदिया : गर्दीचा फायदा घेत हात सफाईने दागिने चोरी होण्याच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. महत्त्वाचं म्हणजे महिलांच चोरी करत असल्याचं निदर्शनास आलं आहे. गोंदियामधील देवरी तालुक्यामध्ये दागिने चोरी होण्याच्या घटना वाढत आहे. याआधी पाच महिलांना चोरी करताना रंगेहाथ पकडलं होतं. अशाच प्रकारची घटना पुन्हा घडली असून रक्षाबंधन सणाचा फायदा घेत चोरीचा प्लॅन होता मात्र महिलेच्या सतर्कतेमुळे तो फेल गेला.

नेमकं काय घडलं?

देवरी येथे ग्रामीण भागातून अनेक महिला खरेदासाठी येत असतात त्यानंतर घरी जाताना बसला गर्दी होते. याच गर्दीचा फायदा हे भुरटे चोर घेतात. आमगाव येथील महिला घरी जाण्यासाठी बसमध्ये जात असताना त्यांच्या गळ्यातील दागिने चोरीला गेले. त्यांना लक्षात आल्यावर याबाबत बस स्थानकामध्ये असलेल्या पोलिसांना दिली. त्यानंडतर पोलिसांनी महिला पोलिसांना बोलावत तिथल्या परिसरातील महिलांची झडती घेण्यात आली.

पोलिसांनी झडती घेतल्यावर तिथेच एका महिलेजवळ संबंधित महिलेचा दागिना सापडला.देवरी तालुक्यामध्ये बस मधील गर्दीच्या वेळी चोरी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर फायदा घेत असल्याचे दिसून येत आहे. आणि यामुळे देवरी पोलिसांनी आपली गस्त बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात गोपनीय पद्धतीने राबवली आहे

दरम्यान, देवरी पोलिसांनी आपली गस्त बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात गोपनीय पद्धतीने राबवली आहे. त्यामुळेच आज पुन्हा एकदा चोरी करताना महीलेला अटक करण्यात आली आता तरी परिवहन विभाग बस स्थानकाच्या परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे लावेल अशी मागणी आता पुन्हा जोर धरू लागली आहे.