चिंचपोकळीच्या चिंतामणी मंडळाच्या मंडपात घडला धक्कादायक प्रकार; तरुणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

| Updated on: Sep 04, 2022 | 5:23 PM

व्हायरल व्हिडिओमध्ये एका तरुणाला मंडळाचे कार्यकर्ते बेदम मारहाण करत असल्याचे दिसत आहे. तरुणाला जमीनीवर आडव पाडून त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण होत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. चोरीच्या संशयावरुन या तरुणाला मारहाण करण्यात आल्याचा दावा मंडळाकडून करण्यात आला आहे. मारहाण झालेला तरुण हा चोर असल्याचा दावा देखील मंडळाच्या अध्यक्षांनी केला आहे.

चिंचपोकळीच्या चिंतामणी मंडळाच्या मंडपात घडला धक्कादायक प्रकार; तरुणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण
Follow us on

मुंबई : मुंबईच्या गणेशोत्सवाला गालबोट लागले आहे. मुंबईतील प्रसिद्ध अशा चिंचपोकळीच्या(Chinchpokli) चिंतामणी मंडळाच्या(Chintamani Mandal ) मंडपात अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. चिंतामणी मंडपाच्या प्रवेशद्वाराजवळच एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. मंडळाकडून याचा खुलासा करण्यात आला आहे.

कोण आहे मारहाण झालेला तरुण

व्हायरल व्हिडिओमध्ये एका तरुणाला मंडळाचे कार्यकर्ते बेदम मारहाण करत असल्याचे दिसत आहे. तरुणाला जमीनीवर आडव पाडून त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण होत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. चोरीच्या संशयावरुन या तरुणाला मारहाण करण्यात आल्याचा दावा मंडळाकडून करण्यात आला आहे. मारहाण झालेला तरुण हा चोर असल्याचा दावा देखील मंडळाच्या अध्यक्षांनी केला आहे.

व्हायरल व्हिडिओवर चिंतामणी मंडळाचा खुलासा

शुक्रवारी हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मंडळाच्या अध्यक्षांनी या व्हिडिओवर खुलासा केला आहे. एका व्यक्तीने एका आज्ञात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिलने आरडा ओरडा केला असता व्यक्तीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. हा अज्ञात व्यक्ती भाविक नव्हता. दागिने चोरणाऱ्या या अज्ञात व्यक्तीला मारहाण झाली आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी कुणालाही मारहाण केली नाही. त्या चोराला पदाधिकाऱ्यांनी चोप दिला असल्याचे अध्यक्षांनी सांगितले. आमचं मंडळ हे महाराष्ट्रातील आदर्श मंडळांपैकी एक आहे.  या ठिकाणी आम्ही सेवा देत असतो त्यामुळे आमचे कार्यकर्ते हे सेवाभावी वृत्तीने या ठिकाणी काम करतात. मंडळाकडून अगदी नियोजन पद्धतीने गर्दीवर नियंत्रण ठेवले जात असल्याचे अध्यक्षांनी सांगितले.

मुंबईच्या लालबाग, परळ परिसरात गणेश भक्तांची तुफान गर्दी

दोन वर्षानंतर यंदा प्रथमच कोणत्याही निर्बंधाशिवाय राज्यात गणेशोत्सव साजरा होत आहे. लालबागच्या राजासह, चिंतामणी या मुंबईतील प्रसिद्ध गणपतींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची तुफान गर्दी पहायला मिळत आहे.