AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट केला इंडिया गेटचा फोटो शेअर, मोठे विधान करत म्हटले…

अमेरिकेचे दुसऱ्यांदा अध्यक्ष झाल्यापासून डोनाल्ड ट्रम्प सातत्याने चर्चेत आहेत. डोनाल्ड ट्रम्प घेत असलेल्या निर्णयाचा परिणाम फक्त अमेरिकेपुरताच मर्यादित राहिला नाही तर तो जगावर होतो.

डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट केला इंडिया गेटचा फोटो शेअर, मोठे विधान करत म्हटले...
Donald Trump
| Updated on: Feb 03, 2026 | 8:50 AM
Share

टॅरिफच्या मुद्द्यात भारत आणि अमेरिकेचे संबंध तणावात असल्याचे बघायला मिळाले. मुळात म्हणजे भारत आणि अमेरिकेची अनेक वर्षांची मैत्री आहे. मात्र, टॅरिफच्या मुद्द्यात कुठेतरी संबंध ताणले गेले. आता अमेरिकेने 25 टक्के टॅरिफ 18 टक्क्यांवर आणला. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेने भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ अशा असून 50 टक्के टॅरिफ लावला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील परस्पर टॅरिफ 18 पर्यंत कमी करण्याची घोषणा केली. त्यांनी भारताच्या रशियन तेल खरेदीबाबतही मोठा केला. भारतावर मोठा टॅरिफ लावण्यानंतरही डोनाल्ड ट्रम्प सातत्याने सांगताना दिसले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे खूप जास्त चांगले मित्र आहेत. आता त्यांनी भारतावरील टॅरिफ मोठ्या प्रमाणात कमी केला. भारतावरील टॅरिफ कमी केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट इंडिया गेटचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला.

विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी इंडिया गेटची भारताचे भव्य विजयी कमान म्हणून वर्णन केले. ट्रुथ सोशलवर डोनाल्ड ट्रम्प यांनी ही पोस्ट शेअर केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी इंडिया गेटचा फोटो शेअर करत लिहिले की, भारताचा इंडिया गेट हा एक भव्य ऐतिहासिक वारसा आहे… पण आमचा ट्रायम्फल आर्च मोठा आणि महान असेल.. ट्रम्प यांच्या या पोस्टमुळे वॉशिंग्टन डीसीमध्ये इंडिया गेटसारखी रचना बांधण्याची त्यांची इच्छा असल्याचे संकेत आहेत.

अमेरिकेच्या 250 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त वॉशिंग्टन डीसीमध्ये एक भव्य ट्रायम्फल आर्च बांधण्याची योजना ट्रम्प विचारात घेत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी इंडिया गेटचा भव्य असा फोटो त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला. मागील काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प भारत दाैऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी भारतातील महत्वाच्या वास्तूंना भेट दिली.

भारतातील इंडिया गेट डोनाल्ड ट्रम्प यांना चांगलेच आवडल्याचे बघायला मिळत आहे. भारतावर विरोधात सतत भूमिका घेणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची आता भूमिका मवाळ झाली आहे. त्यांनी जाहीर केले की, आम्ही भारतावरील टॅरिफ कमी करत आहोत. भारतासोबतची मैत्री कायम ठेवण्यासाठी अमेरिकेने टॅरिफ कमी केल्याचे बोलले जात आहे.

Follow Us
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ