AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar : मी तुम्हाला घट्ट मिठीत घेऊन… अजित पवार यांच्या जाण्याने लेक भावूक, खास फोटो आणि पोस्ट..

अजित पवार यांच्या अकस्मात निधनाने संपूर्ण राज्य शोकाकुल आहे. त्यांच्या कुटुंबाला तर मोठा धक्का बसला. विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या मुलाने वडिलांसोबतचे सोनेरी क्षण शेअर करत भावूक पोस्ट लिहीली आहे.

Ajit Pawar : मी तुम्हाला घट्ट मिठीत घेऊन... अजित पवार यांच्या जाण्याने लेक भावूक, खास फोटो आणि पोस्ट..
अजित पवार यांच्या लेकाची भावूक पोस्टImage Credit source: social media
| Updated on: Feb 03, 2026 | 8:38 AM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने अख्ख्या महाराष्ट्राला मोठा धक्का बसला, गेल्या बुधवारी ( 28 जानेवारी) अजित पवार हे सभांसाठी मुंबईहून बारामतीला जात होते. मा्तर बारामती विमानतळाजवळ आल्यानंतर त्यांचं विमान क्रॅश झालं आणि स्फोट होऊन आग लागली. यामध्ये अजित पवार यांचा मृत्यू झाला, तसे आणखी चौघेही मृत्यूमउखी पडले. सकाळी 8.45 च्या सुमारास हा अपघात झाला आणि तो दिवस राज्यासाठी काळा दिवस ठरला. अजित पवार यांच्या जाण्याने संपूर्ण राज्य शोकाकुल झालं. त्यांच्या कुटुंबावर तर हा अतिशय मोठा आघात आहे.

गुरूवारी (29 जानेवारी) बारामतीमध्ये शोकाकुल वातावरणात अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थ पवार आणि जय पवार, दादांच्या या दोन्ही मुलांनी सर्व विधी करत दादांवर अंत्यसंस्कार केले. त्यावेळी अतिशय भावूक वातावरण होते. अजित पवरांच्या निधनानंतर काही दिवसांतच त्यांच्या पत्नी, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावेळी त्यांचा मुलगा जय पवार हा त्यांच्यासोबत सावलीसारख होता, तर पार्थ पवार हे बारामतीमध्ये होते. सांत्वनांसाठी यणाऱ्या लोकांना भेटण्यासाठी ते बारामतीत राहिले.

दरम्यान अजित पवार यांच्या निधनाला आज (मंगळवार 3 फेब्रुवारी) 7 दिवस होत आले असून कोणाच्याही डोळ्यांत अश्रूंना खळ नाही. त्यांच्या निधनानंतर, बहीण सुप्रिया सुळे या सतत अजित पवार यांच्यासंदर्भात व्हॉट्सअप स्टेटस ठेवचना दिसत आहेत. कालही त्यांनी व्हॉट्सअप स्टेटस अजित पवार यांच्यासोबतचा जुना फोटो ठेवला होता. ज्याची बरेच चर्चा झाली.

वडिलांच्या आठवणीत लेक झाला भावूक

अजित पवार यांच्या जाण्यानंतर पार्थ आणि जय, ही त्यांची दोन्ही मुलं धीरोदात्तपणे या कठीण काळाचा सामना करताना दिसली. दरम्यान आता अजित पवारांचा धाकटा मुलगा जय पवार हा वडिलांच्या आठवणीत अतिशय भावूक झालेला दिसला. जय पवार यांनी सोशल मीडियावरील त्यांच्या अकाऊंटवर अजित पवारांसोबतचे काही खास फोटो पोस्ट केले असून कॅप्शनही लिहीली आहे.

जय पवार यांनी शेअर केलेल्या फोटोत ते आणि अजित पवार गॉगल लावून पोझ देताना दिसत आहे. Missing you a lot Dad अशी छोटीशी कॅप्शन त्यांनी यासोबत लिहीली आहे. तर पुढच्या फोटोमध्ये जय यांनी अजित पवार यांना घट्ट मिठी मारल्याचे आणि अजित पवार हे हसतमुखाने उभे असल्याचे दिसत आहे. या फोटोसोबत तर जय पवार यांनी अतिशय भावूक कॅप्शन लिहीली आहे. ” Dad, काश वेळ थांबली असती… मी तुम्हाला घट्ट मिठीत घेऊन आयुष्यभर तसाच राहिलो असतो. ” असं त्यांनी या फोटोसोबत लिहीलं आहे.

दोन्ही फोटोंमधून जय पवार यांचं वडीलांसोबतचं खास, घट्ट नातं दिसत असून जय पवार अजित पवारा यांना प्रचंड मिस करत असल्याचं यातून दिसत आहे.

Follow Us
आता तरी सुषमाताईंना पक्षाने...सचिन अहिरांचं मोठं विधान, नेमकं काय...
आता तरी सुषमाताईंना पक्षाने...सचिन अहिरांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
दिवसभर काम आणि अनेक दौरे केल्यानंतर... रोहित पवारांना नेमकं काय झालंय?
दिवसभर काम आणि अनेक दौरे केल्यानंतर... रोहित पवारांना नेमकं काय झालंय? ब्रीच कँडी रुग्णालयातील व्हिडीओ आला समोर
26 फेब्रुवारीच्या बैठकीत घडलं ते... निवडणूक आयोगाकडून NCP ला तातडीचे न
Sunetra Pawar | निवडणूक आयोगाकडून NCP ला तातडीचे निर्देश; 26 फेब्रुवारीच्या बैठकीत घडलं ते...
उद्धव ठाकरेंना आणखी मोठा हादरा! विश्वासू महिला नेत्याच्या राजीनाम्यानं
उद्धव ठाकरेंना आणखी मोठा हादरा! विश्वासू महिला नेत्याच्या राजीनाम्यानंतर...
ट्रेकिंगचा थरार ठरला जीवघेणा! दरीत पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
मोठी बातमी! रायगडमध्ये ट्रेकिंगचा थरार ठरला जीवघेणा! दरीत पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
मोठी बातमी! Gen Z बाबत सरसंघचालक मोहन भागवत यांचा मोठा निर्णय; मुंबईत
मोठी बातमी! Gen Z बाबत सरसंघचालक मोहन भागवत यांचा मोठा निर्णय; मुंबईत तब्बल 2000...
माझ्यासारख्या व्यक्तीला वाटतं की...; पंकजा मुंडेंनंतर आता धनंजय मुंडे
माझ्यासारख्या व्यक्तीला वाटतं की...; पंकजा मुंडेंनंतर आता धनंजय मुंडेंचंही मोठं विधान
मोठी उलथापालथ! वाशिममध्ये भाजपचा मविआला जबर धक्का, अनेक नेते...
मोठी उलथापालथ! वाशिममध्ये भाजपचा मविआला जबर धक्का, अनेक नेते, पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशाने खळबळ!
धनंजय मुंडेंच्या निवृत्तीच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंची फटकेबाजी...
धनंजय मुंडेंच्या निवृत्तीच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंची फटकेबाजी, म्हणाले मराठ्यांच्या नादी ...
CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या; कोर्टाचे सर्व...
मोठा दिलासा! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या; कोर्टाचे सर्व राज्यांना आदेश