Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंनी सीईटी परीक्षेवरून मोठा बॉम्ब टाकला; भाजप नेत्यांचं टेन्शन वाढलं
aaditya thackeray : आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सीईटी पेपर घोटाळ्यामुळे भाजपची मुले टॉपर येत आहे, असा आरोप ठाकरेंनी केला.

नीट पेपर, MPSC परीक्षेनंतर MH-CET परीक्षेवरून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. बारावीत कमी गुण असतानाही मात्र विद्यार्थ्यांना MH-CET परीक्षेत पर्सेंटाइल अधिक मिळत असल्याचा दावा करण्यात येत आहे. एका भाजप नगरसेवकांच्या जुळ्या मुलांना या परीक्षेत बारावीत कमी गुण असतानाही 99 पर्सेंटाइल मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. या आरोपानंतर एकच खळबळ उडाली आहे. कथित सीईटी घोटाळ्यामुळे भाजप नेत्यांची मुले टॉपर होत असल्याचा गंभीर आरोप आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आदित्य ठाकरेंच्या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे.
आदित्य ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राज्यातील विविध घडामोडींवर भाष्य केलं. सीजेपी आंदोलनामुळे विद्यार्थ्यांवर झालेल्या FIR बाबत ठाकरे म्हणाले, ‘सीजेपी आंदोलनावेळी अनेक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यावेळीच आम्ही मदतीसाठी इमेल दिला होता. या केसेस आम्ही विनामूल्य लढू, असं आम्ही जाहीर केलं होतं. या दिवसांत मुख्यमंत्र्यांनी निर्देश देऊन सर्व एफआयआर मागे घ्याव्या. जर एफआयआर मागे घेतल्या नाही, तर आंदोलन करायचं की नाही, हे ठरवू. आमच्या इमेल आयडीवर तुमच्या नोटीस आणि एफआयआर पाठवा. आम्ही विनामूल्य लढवू. आम्ही वकिलांनाही विनंती करत आहे. तुम्ही पुढे यावं. आमच्याशी संपर्क साधावा’.
‘नीट पेपरफुटीनंतर आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात आंदोलकांवर पॅलेट गन, बिहारमध्ये एके-47, लाठीचार्ज , लाठीवर गंजलेले खिळे, इलेक्ट्रिक शॉक, देण्याच्या घटना घडल्या. डॉक्टरांना मारणाऱ्या रमेश म्हात्रेला बेल देण्यासाठी सरकार उत्सुक आहे. न्यायव्यवस्था चांगली भूमिका घेत आहे. डॉक्टर झाल्यावर मारहाण केली जाते. डॉक्टरांसाठी लढला तर तुमच्यावर केसेस केल्या जातात. सरकार हे तरुण विरोधी आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
तरुणींवरही अमानुषपणे लाठीचार्ज केल्याचा आरोप
‘MH-CET परीक्षेत घोटाळा झाला की नाही, यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोणतंही भाष्य केलेलं नाही. नांदेडमधील दोन भाऊ बहीण आहेत. त्यांचे बारावीचे मार्क बघा. त्यानंतर सीईटीचे मार्क बघा. भंडाऱ्यातही असंच प्रकरण आहे. हे सर्व प्रकरण भाजपशी निगडीत आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य करावं. आता उद्यापासून प्रवेश सुरू होतील. या प्रकरणानंतर प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देणार आहात का, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये घोळ आहे. मागच्या वर्षी देखील असंच झालं. कॅप राऊंड 4 दिवसांत बंद केले. यात अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान होते. पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल यांनी जबाबदारी अंगावर घेतली. तसं मुख्यमंत्र्यांनी सांगावं. लाठीचार्जसाठी कोणी आदेश दिले, हे सांगावे. नागपुरातील विद्यार्थिनीला फरफटत नेलं. पुरुष पोलीस तिच्या अवतीभवती होते. मारहाण झाल्यावर तिला चक्कर आली. एका महिलेला गंभीर दुखापत झाली. अशी परिस्थिती हाताळण्याचा कोणालाही अधिकार नाही. सरकार नोटीस पाठवून रिल्स काढायला सांगत आहे. सरकार कोणाला घाबरत आहे. विद्यार्थ्यांचं ऐकलं असतं, ऐवढं झालं नसतं. विद्यार्थ्यांनी हुकूमशहाला झुकवलं. आता त्यांचे इन्स्टाग्रॅम अकाऊंट बंद करण्याच्या मागे लागला आहात. फेसबुक आणि ट्विटर अकाऊंट बंद करण्याच्या मागे लागला आहेत. तुमच्या रिल्स सेव्ह करून ठेवा. त्या रिल्स पुन्हा अपलोड करूयात, असेही त्यांनी सांगितले.