AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मृतदेहाशी लग्न करणाऱ्या आंचलने हातच जोडले… म्हणाली, कृपया माझी बदनामी थांबवा…

Aanchal Mamidwar : बॉयफ्रेंडच्या मृतदेहाशी लग्न केल्याने नांदेड येथील आंचल मामीडवार चर्चेत आली होती. मात्र सक्षमचे घर सोडल्याने आता तिची बदनामी होत आहे, तिने आता हात जोडत बदनामी थांबवण्याची विनंती केली आहे.

मृतदेहाशी लग्न करणाऱ्या आंचलने हातच जोडले... म्हणाली, कृपया माझी बदनामी थांबवा...
Aanchal Mamidwar Saksham TateImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jun 14, 2026 | 10:10 PM
Share

काही महिन्यांपूर्वी नांदेडमधील एक प्रकरण खूप गाजलं होतं. आपल्या बॉयफ्रेंडच्या मृतदेहाशी लग्न केल्याने नांदेड येथील आंचल मामीडवार चर्चेत आली होती. तिने प्रियकर सक्षम ताटे या तरूणाच्या मृतदेहाशी लग्न केले होते. सक्षमच्या मृत्युनंतर आपण आजन्म सक्षम बनून त्याच्या घरी राहणार असल्याचे आंचल मामीडवार हिने जाहीरपणे सांगितले होते. मात्र आता या प्रेम कहाणीला वेगळं वळण लागलं आहे. आंचलने सक्षमच घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तिची बदनामी होत आहे, त्यामुळे आता तिने घर सोडण्याचं कारण सांगत बदनामी थांबवण्याची विनंती केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सक्षमचा खून

सक्षमच्या मृत्युनंतर आपण आजन्म सक्षम बनून त्याच्या घरी राहणार असल्याचे आंचल मामीडवार हिने जाहीरपणे सांगितले होते. पण आंचल सक्षमचे घर सोडून वडिलांच्या घरी निघून गेलीये. नोव्हेबर 2025 मध्ये सक्षम ताटे या तरुणाचा खूण आंचलचे वडील, तिचा भाऊ आणि त्याच्या साथीदाराने गोळ्या झाडून केला होता. मयत सक्षम ताटे आणि आंचलचा भाऊ हे मित्र होते. आंचलच्या कुटुंबीयांकडून या प्रेम प्रकरणाला विरोध होता. तरीही दोघांचे प्रेमसंबंध सुरु असल्याने सक्षमची हत्या करण्यात आली होती.

आंचलने घर सोडलं…

सक्षमच्या हत्येच्या दुसऱ्या दिवशी अंतयात्रा निघण्यापूर्वी आंचल त्याच्या घरी पोहोचली आणि तिने टाहो फोडला. सक्षमच्या मृतदेहाशी तीने लग्न केले होते. देशभरात ही बातमी त्यावेळी गाजली होती. सक्षम गेला तरी मी आजन्म सक्षम बनून त्याच्या घरीच राहणार असे माध्यमासमोर आंचल ने सांगितले होते. पण तीच आंचल सक्षमच्या घरून निघून सक्षमच्या आईला एकटं सोडून निघून गेल्याचा आरोप सक्षमच्या आईने केल्यानंतर आपण घर का सोडलं हे आंचलने स्पष्ट केलंय.

माझी बदनामी थांबवा…

आंचलने म्हटले की मी त्यांच्या घरी चांगल्या मनाने गेले होते. मी तिकडे राहत पण होते, पण सक्षमचा भाऊ माझ्याबरोबर नीट वागत नव्हता, त्याच माझ्याबद्दल बॅड इंटेंशन होत. हे मी त्याच्या घरच्यांना सांगितलं होत, ही गोष्ट पोलिसांना सुद्धा माहिती आहे. या गोष्टीमुळे मी सक्षमच घर सोडल आहे. त्याची आई आता माझी बदनामी करत आहे. कृपया माझी बदनामी थांबवा अशी विंनती आंचलने केली आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी