AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anchal Mamidwar: सक्षमचं घर का सोडलं? आंचल मामीडवार पहिल्यांदाच समोर… सक्षमच्या लहान भावाचे नाव घेत धक्कादायक खुलासा

Nanded Anchal Mamidwar Case: सक्षम ताटे याच्या मृतदेहाशी लग्न करणारी त्याची प्रेयसी आंचल मामीडवार अचानक त्याचे घर सोडून गेल्याने एकच चर्चा सुरू होती. आता याप्रकरणात समाज माध्यमावरील चर्चेनंतर आंचल मामिडवार हिने समोर येत धक्कादायक खुलासा केला आहे.

Anchal Mamidwar: सक्षमचं घर का सोडलं? आंचल मामीडवार पहिल्यांदाच समोर... सक्षमच्या लहान भावाचे नाव घेत धक्कादायक खुलासा
सक्षम ताटे, आंचल मामीडवार
| Updated on: Jun 13, 2026 | 4:59 PM
Share

Anchal Mamidwar-Saksham Tate Nanded: नांदेडमधील ऑनर किलिंग प्रकरणातील आंचल मामीडवार हिने प्रियकर सक्षम ताटे याच्या मृतदेहाशी लग्न केले होते. प्रेमसंबंधातून सक्षम ताटेचा गेल्या वर्षी गोळ्या घालून खून करण्यात आला होता. या रक्तरंजित प्रेम कहाणीने राज्य हादरले होते. तर आंचल हिने घरांच्याच्या विरोधात साक्ष दिली होती. स्वतःच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल केला होता. सक्षमच्या घरी कायमचं राहणार असल्याचे म्हटले होते. पण काही दिवसांपूर्वी सक्षमच्या आईने प्रसारमाध्यमांसमोर येत आंचल घर सोडून निघून गेल्याचे सांगितले. त्यानंतर याप्रकरणाची चर्चा सुरू झाली. आंचल अशी अचानक घर सोडून का गेली? प्रेमाच्या आणाभाका कशी विसरली अशी सोशल मीडियावर चर्चा झाली. आता आंचल मामीडवार हिने माध्यमांसमोर येत घर सोडण्याविषयी धक्कादायक खुलासा केला आहे.

आजीकडे जाण्याचा बहाणा करून सोडले घर

सक्षम ताटेच्या आईने एका मराठी दैनिकाला मुलाखत दिली होती. त्यात संगिता ताटे यांनी आंचल अचानक घर सोडून गेल्याची माहिती दिली होती. आजीकडे जाण्याचा बहाणा करत तिने घर सोडल्याचे संगिता ताटे म्हणाल्या होत्या. त्यानंतर समाज माध्यमांवर उलट सुलट चर्चा सुरू झाली होती. काहींनी आंचलची बाजू उचलून धरत तिला तिचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे म्हटले होते. तर याप्रकरणी आता आंचल मामीडवार हिने धक्कादायक खुलासा केला आहे.

आंचलचा धक्कादायक खुलासा

या प्रकरणात आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आजीकडे जाण्याच्या बहाण्याने आंचलने घर सोडल्याचे सक्षम ताटे याच्या आईचे म्हणणे आहे. तर सक्षमचा लहान भाऊ आपल्याशी गैरवर्तन करत असल्याचा गंभीर आरोप आंचल मामीडवार हिने केला आहे. सक्षमचा लहान भाऊ गैरवर्तन करत असल्यानेच आपण घर सोडण्याचा निर्णय घेतल्याचे प्रत्युत्तर आंचल मामीडवार हिने दिले आहे. तर सक्षमला न्याय मिळवून देण्यासाठी आपण एकटेच लढत असल्याचा दावाही तिने केला. आता या प्रकरणाला अजून वेगळी दिशा मिळाल्याचे समोर आले आहे. आता आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी तीव्र झाल्याचे समोर आले आहे. 27 नोव्हेंबर 2025 रोजी नांदेड शहरातील इतवारा परिसरात सक्षम ताटे याच्यावर गोळीबार करण्यात आला होता आणि फरशीचे घाव घालून त्याचा खून करण्यात आला होता. आंचलचे प्रेमसंबंधी तिच्या कुटुंबियांना मान्य नव्हते. या घटनेपासून आंचल ही सक्षमच्या घरीच राहत होती.

Follow Us
मोदींच्या कार्याची उंची हिमालयासारखी, समर्पण अरबी समुद्राएवढं!
Eknath Shinde | मोदींच्या कार्याची उंची हिमालयासारखी, समर्पण अरबी समुद्राएवढं! पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलं कौतुक
मुंबईत कोणी भीक घालणार नाही म्हणून उपोषण मागे घेतलं
Laxman Hake | मुंबईत कोणी भीक घालणार नाही म्हणून उपोषण मागे घेतलं, लक्ष्मण हाके यांची जरांगेवर टीका
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा!
Devendra Fadnavis | मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला मोठा प्लॅन, Video बघाच
58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... तायवाडेंचा मोठा दावा
Babanrao Taywade | 58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... बबनराव तायवाडेंचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाले?
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदारांवर तरुणीने...
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांवर तरुणीने केले गंभीर आरोप
दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar | दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी!
Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी! मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
Devendra Fadnavis | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्री फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर...
Manoj Jarange | मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटलांची मोठी मागणी
20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी..
Manoj Jarange Patil |  20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल होणार