
देव तारी त्याला कोण मारी ! अशी एक म्हण आपल्याकडे विख्यात आहे. अर्थात ज्याच्या डोक्यावर देवाचा हात, त्याचा आशिर्वाद आहे, त्याच्यावर कितीही संकट आली तर त्याला काही त्रास होत नाही, असा त्याचा अर्थ.छत्रपती संभाजी नगर शहरात हीच म्हण प्रत्यक्षात उतरली असं म्हटलं तर खोटं ठरणार नाही. जन्मानंतर अवघ्या काही तासाच गोणीत भरून कचऱ्यात फेकण्यात आलेलं एक नवजात बाळ तिथे सापडलं. त्याच्या आईने घरीच प्रसतून करून नाळ कापून, जन्ानंतर काही तासाच त्या मुलाला गोणीतून कचरा कुंडीत फेकलं. मोकाट कुत्र्यांनी ते पोतं रस्त्यात बाहेर खेचलं आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे ते मूल ज्या गोणीत होतं त्यावरून दोन बसेस गेल्या, तरी त्या बाळाला काहीच झालं नाही. त्या नवजात बालाचीच सध्या सर्व लोकांच्या तोंडी चर्चा आहे. देवाच्या कृपेने ते वाचलं हेचं खरं, असं लोकं म्हणत आहेत.
नेमकं काय झालं ?
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजी नगर शहरातील पुंडलिकनगर भागातील ही धक्कादायक घटना आहे. तेथे राहणारी 24 वर्षांची तरूणी ही पतीपासून विभक्त झाली. घटस्पोटानंतर तिची त्याच शहरा राहणाऱ्या एका तरूणाशी ओळख झाली, त्यांचे प्रेमसंबंध होते. आणि त्याच प्रियकरापासून ती गर्भवती राहिली. त्यामुळे तिने घरीच तिची प्रसूती केली. कोणालाही कळू नये म्हणून तिने हे पाऊल उचललं. या नवजात बालकाची परस्पर विल्हेवाट लागावी यासाठी घरीच प्रसूती करून स्वतःच नाळ कापून टाकली आणि जन्म झाल्यानंतर काही तासातच आईने या बाळाला पोत्यात भरून कचऱ्याच्या कुंडीजवळ पेकून दिलं.
त्यानंतर शहरातील मोकाट कुत्र्यांनी पोत दातात धरून बाहेर खेचलं. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे बाळ असलेलं ते पोत रस्त्यावर आल्यावर त्या पोत्यावरून 2 वेळेस बसही गेल्या.पण त्या बाळाचं दैव बलवत्तर म्हणून त्याला काही झालं नाही, ते वाचलं. मात्र काही तासांपूर्वी जन्म झालेल्या त्या बाळाच्या छातीवर कुत्र्याचे दात लागल्याने त्याला जखमा झाल्या आहेत. हे बाळ सापडल्याचं लक्षात आल्यावर स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळवलं. त्यांनी घटनास्थळी धाव घेत बाळाला ताब्यात घेतलं आणि आता आता ते नवजात बालक हे नवजात शिशु विभागात उपचार घेत असून सुखरूप आहे. दरम्यान पुंडलिक नगर पोलिसांनी त्या भागातील सीसीटीव्ही फूटेज तपासून त्या बाळाला फेकून देणाऱ्या महिलेचा शोध लावत तिला ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.