AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सक्षम जेलमधून सुटून आल्यानंतरच… आचल मामीलवाड हिने वडील आणि भावाबद्दल केला मोठा खुलासा

Nanded Crime News : आचल मामीलवाड हिने तिचा प्रियकर सक्षम ताटे याच्या मृतदेहासोबत लग्न केले. आचलच्या भावाने आणि वडिलांनी गोळ्या झाडून सक्षमची हत्या केली. या घटनेने खळबळ उडालेली असतानाच आता मोठा खुलासा आचलने केला आहे.

सक्षम जेलमधून सुटून आल्यानंतरच... आचल मामीलवाड हिने वडील आणि भावाबद्दल केला मोठा खुलासा
Achal Mamilwad and Saksham Tate
| Updated on: Dec 01, 2025 | 10:32 AM
Share

नांदेडच्या आचल मामीलवाड हिने प्रियकर सक्षम ताटे याच्या मृतदेहासोबत लग्न केले. आचल मामीलवाड हिच्या वडिलांनी आणि भावाने तीन गोळ्या झाडून सक्षमची हत्या केली. गोळ्या लागल्यानंतरही सक्षम पळत होता, त्यानंतर त्याच्या डोक्यात फरशी घातली आणि त्याचा जीव घेतला. सक्षमला गोड बोलून भाऊ आणि वडिल घेऊन गेल्याची कल्पना आचलला होती. सोशल मीडियावरून मेसेजमुळे सक्षम आणि आचल यांच्या प्रेमसंबंधांबद्दल आचलच्या कुटुंबियांना कुणकुण लागली होती. सक्षमला आचलपासून दूर राहण्याचा सल्ला तिच्या भावाने दिला होता. मात्र, तरीही आचल आणि सक्षम ऐकण्यास तयार नव्हते.

सक्षम ताटे अवघ्या 20 वर्षाचा होता. मात्र, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. हेच नाही तर आचल मामीलवाड हिच्याही कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. सक्षमच्या हत्येबद्दल कळताच आचल मामीलवाड हिने त्याच्या घरी धाव घेतली आणि त्याच्या हाताने आपल्या शरीरावर हळद लावून घेतली आणि त्यालाही हळद लावली. तिने सक्षमच्या मृतदेहासोबत लग्न केले. यावेळी तिने आपल्या कुटुंबियांवरून अत्यंत गंभीर आरोप केले.

माझ्या भावाला आणि वडिलांना फाशीचीच शिक्षा द्या, असेही तिने रडत रडत म्हटले. सक्षम मरूनही जिंकला आणि ते हरले. आयुष्यभर सक्षमची बायको म्हणूनच मी राहणार. यादरम्यान आचल मामीलवाड हिने सांगितले की, माझ्या घरच्यांना माझे आणि सक्षमचे संबंध मान्य नव्हते. मी आणि सक्षम गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंधांमध्ये होतो. सक्षम हा जेलमधून सुटून आल्यानंतर त्याची हत्या करायची हा कट माझ्या कुटुंबियांकडून रचला जात होता.

त्यांनी मलाही धमकी दिली होती. सक्षम नसला तरीही मी त्याच्याच घरी आता आयुष्यभर त्याची बायको म्हणून राहणार आहे. सक्षम ताटे याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर त्याच्यावर पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली होती. तो काही दिवसांपूर्वी जेलमधून बाहेर आला होता. सक्षम आणि आचल यांना लग्न देखील करायचे होते. मात्र, त्यापूर्वीच आचलच्या वडिलांनी, भावाने आणि अजून काही लोकांनी मिळून सक्षमची हत्या केली.

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?