Nanded Murder Case : आचल मामीलवाड हिच्या आईबद्दल अत्यंत मोठा खुलासा, सक्षमवर गोळ्या झाडण्याअगोदर दोन तास…
Nanded Crime News : अनेकदा आंतरजातीय विवाहाला समाजाकडून आणि कुटुंबियांकडून जोरदार विरोध होतो. हा विरोध इतका जास्त वाढतो की, थेट हत्या केल्या जातात. अशीच नांदेडमध्येही खळबळ उडवणारी घटना घडली.

प्रेमात सर्वकाही माफ असते. ज्यावेळी आपल्याला एखाद्या व्यक्तीवर प्रेम होते त्यावेळी जात, धर्म आणि पंत पाहून नक्कीच नाही. मात्र, अनेकदा आंतरजातीय विवाहाला समाजाकडून आणि कुटुंबियांकडून जोरदार विरोध होतो. हा विरोध इतका जास्त वाढतो की, थेट हत्या केल्या जातात. नुकताच नांदेडमध्येही अशाच प्रकारची खळबळ उडवणारी घटना घडली. दोन तरुण-तरुणींच्या आयुष्याने भयावह वळण घेतले. या प्रेमसंबंधांना मुलीच्या घरच्यांचा प्रचंड विरोध होता. कुटुंबियांनी धमकी देऊन समजावून दोघांना सांगितले होते. मात्र, दोघे एकमेकांवर इतके जास्त प्रेम करायचे की, ते विभक्त होऊ शकत नव्हते. आचल मामीलवाड आणि सक्षम ताटे अशी दोघांची नावे.
सक्षमच्या हत्येनंतर आचल मामीलवाडचा अत्यंत मोठा खुलासा
आचल मामीलवाडच्या वडिलांनी आणि भावाने इतर काही जणांसोबत मिळून सक्षमवर तीन गोळ्या झाडल्या. त्यानंतरही सक्षम पळून जात होता, थेट त्याच्या डोक्यात फरशी घातली आणि जागीच सक्षमचा जीव गेला. या प्रकरणात एका मागून एक मोठे खुलासे होताना दिसत आहेत. सक्षमच्या मृत्यूनंतर आचल मामीलवाड थेट त्याच्या घरी पोहोचली आणि त्याच्या मृतदेहासोबतच लग्न केले.
सक्षमच्या हत्येपूर्वी आचलच्या आईने दिली होती मोठी धमकी
सक्षम मृत्यूनंतरही जिंकला आणि माझे कुटुंबिय हरल्याचे तिने म्हटले. आयुष्यभर सक्षमच्या घरी त्याची पत्नी म्हणून राहणार असल्याचे सांगत आचल हिने एकच डाहो फोडला. अंत्यविधी पूर्वी मृतदेहासमोरच त्याच्या नावचे कुंकूही तिने कपाळावर लावले. आता या प्रकरणात खळबळजनक माहिती पुढे येत आहे. सक्षमची हत्या करण्याच्या दोन तास अगोदरच आचलही आई जयश्री मामीलवाड ही सक्षमच्या घरी गेली होती.
आचलने केले सक्षमच्या मृतदेहासोबत थेट लग्न
तिथे जाऊन तिने धमकी दिली होती आणि आमच्या पोरीपासून दूर राहा असे सांगितले होते. मामीलवाड यांच्या घरी कायमच सक्षम जात होता. तो आचलच्या भावाचा मित्र होता. मात्र, यांच्या प्रेमसंबंधांबद्दल आचलच्या घरच्यांना कळाल्यानंतर एकच खळबळ उडाली. पोलिसांनी अवघ्या बारा तासांत सर्व आरोपींना ताब्यात घेतले.
