AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सप्तपदी घेण्यापूर्वी तिने स्नान करण्यास नकार दिला, सारं पितळ उघड पडले

आतापर्यंत वराने मुलींना फशी पाडल्याच्या अनेक कहाण्या तुम्ही ऐकल्या असतील परंतू आता स्री लखोबा लोखंडे निघाली असून तिने ती मी नव्हेच म्हणत एक डझनहून अधिक लग्नं केली आहेत.

सप्तपदी घेण्यापूर्वी तिने स्नान करण्यास नकार दिला, सारं पितळ उघड पडले
| Updated on: Jun 11, 2025 | 4:22 PM
Share

केरलच्या तिरुवनंतपुरममध्ये 30 वर्षांच्या तरुणाने लग्नाचं स्वप्न पाहीलं, एका मेट्रीमोनियल साईटवर त्यानं स्थळ पाहीलं. रेश्मा नावाच्या तरुणीशी त्याची ओळख झाली. नंतर फोनवर खूप प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. त्यानंतर लग्नाची एकदाची तारीख ठरली. परंतू लग्नाच्या दिवशी केरळ पद्धतीनुसार सात फेरे घेण्याआधी ती स्नान करण्यास ( नहानम ) तयार होईना. लग्नाआधी शुद्ध होण्यासाठी ही तेथील परंपरा आहे. परंतू ही तरुणी या पद्धतीने स्नान करण्यास तयार होईना, त्यानंतर तिची चौकशी केली तर वरासह सर्वांनाच जबरदस्त धक्का बसला.

रेश्माने जवळपास एक डझन लग्न केल्याचे उघडकीस आले आहे. तिने पोलिसांना दिलेल्या कबुली जबाबात आतापर्यंत १२ लग्न केली आहे. लग्नानंतर ती दागिने आणि अन्य मौल्यवान वस्तू घेऊन घरातून पसार होत असे. रेश्मा ही एर्नाकुलमच्या उदयमपेरूर येथील रहाणारी आहे.याआधी तिची जेवढी लग्न झालेली आहेत ती मेट्रोमोनिअल साईटवरुनच झाली आहेत. ही तरुणी फिल्मी कहानी सांगून पुरुषांना लग्न करण्यास भाग पाडायची. लग्नानंतर सगळा माल घेऊन पळून जायची. अनेक जण लाजेखातर समाजात बदनामी होईल म्हणून तक्रारच करायचे नाहीत, म्हणून तिचे चांगलेच फावले होते. रेश्माला दोन वर्षांचा एक मुलगाही आहे.

दोस्‍ताच्या घरी खुलली पोल

ताज्या प्रकरणात रेश्माने एका महिलेला भाड्याने आई म्हणून उभे केले होते.वर अनीश याने मॅट्रीमोनी ग्रुपमध्ये लग्नाची जाहीरात केली होती. रेश्मा हीने अनीश याच्याशी भेट घेत दावा केला की तिला दत्तक दिलेले आहे. तिच्या आईचे लग्नात रस नव्हता. अनीश या फिल्मी कहानीत अडकला आणि लग्नासाठी लग्न करायला तयार झाला. लग्नाच्या एक दिवस आधी अनिशने रेश्माला आपल्या मित्राच्या घरी थांबवले. तो एक अन्य ग्राम पंचायतीचा सदस्य आहे. लग्नाच्या दिवशी रेश्माने ‘नहानम’ या प्रथेला नकार दिला. त्यानंतर सरळ ब्युटीपार्लरला जाते असे सांगितले. त्यानंतर अनिश याच्या मित्राला रेश्माव संशय आला.

45 दिवसांपूर्वी झाले लग्न

लग्नाची सर्व तयारी आणि पंचपंक्वानाची तयारी पूर्ण झाली होती. परंतू रेश्माच्या बॅगेची तपासणी केली तेव्हा तिच्या बॅगेत आधीच्या लग्नाचे पुरावे मिळाले. अनिश याने या प्रकरणात फसवणूकीची तक्रार दाखल केले आहे. कट्टाकड़ा डीवायएसपी एन. शिबु यांच्या टीमने लग्न मंडपात फिल्मी स्टाईलमध्ये प्रवेश केला आणि रेश्माला बेड्या घातल्या. रेश्माने गुन्ह्यांची कबुली दिली आहे. तिने ४५ दिवसांपूर्वीच एका पुरुषाला फशी पाडत लग्न केले होते. आणि पुढच्या महिन्यात तिरुवनंतपुरम येथे एका व्यक्तीशी लग्न केले होते.

2022 मध्ये चार लग्नं

रेश्‍माने दावा केला आहे हे ते पैशांसाठी करीत नाही तर खऱ्या प्रेमाच्या शोधासाठी करीत आहे. पोलिसांना संशय आहे की रेश्माच्या लग्नाची यादी मोठी लांबू शकते. परंतू फसवलले लोक लाज आणि बदनामीच्या भीतीने समोर येत नाहीत. 2014 मध्ये रेश्मा डिग्रीच्या विद्यार्थीनीच्या रुपात एर्नाकुलमच्या एका व्यक्ती सोबत पळून गेली होती. 2017 पर्यंत एकत्र राहील्यानंतर ती पळून गेली, आणि 2022 पर्यंत तिने चार लग्न केली होती.साल 2023मध्ये तिला मुलगा झाला. साल 2025 तिने 10 दिवसांच्या अंतराने दोन लग्नं केली. सध्याचा लग्न अंघोळीवरुन उघडकीस आले.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.