सोनमचा मंगळ उच्च, राजाची हानी निश्चित…’, इंदूरच्या ज्योतिषाने केला होता दावा
मेघालय पोलिस सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुराव्यांच्या आधारावर या कटाचा सखोल तपास करीत आहेत. सोनम, तिचा प्रियकर राज कुशवाह आणि तिघे मारेकरी अटकेत आहेत

इंदूरचे राजा रघुवंशी हत्याकांडाने देशभरात खळबळ माजली आहे. या प्रकरणात राजाची पत्नीच व्हिलन ठरल्यानंतर आता तिला सर्वजण शिव्याशाप देत आहेत. जर पसंद नव्हता तर घटस्फोट द्यायचा जीव कशाला घ्यायचा असा सल्ला दिला जात आहे. आता या प्रकरणात एका ज्योतीषाने सनसनाटी दावा केला आहे. सोनमला मंगळ उच्च होता. त्यामुळे तिच्याशी लग्न करणाऱ्याची हानी निश्चितच होती असा दावा या ज्योतीषाने केला आहे.
एका खाजगी चॅनलशी बोलताना अजय दुबे यांनी सांगितले की राजा याचा मृतदेह २ जून रोजी मेघालयातील सोहरा परिसरातील वेईसावडॉन्ग धबधब्याजवळ खोल दरीत सापडला ,तेव्हा आपण शांतीपाठ करण्यासाठी एका कुटुंबाकडे गेलो होतो. त्याच वेळी कुटुंबियांनी त्यांनी हत्या आणि सोनम संदर्भात सवाल केले. ज्योतीष अजय दुबे यांनी दावा केला होता की राजाच्या हत्येत कोणा महिलेचा हात आहे. आणि सोनम जीवंत सुरक्षित आहे. आता ही भविष्यवाणी खरी ठरली आहे. कारण सोनम ही गाजीपूर पोलिसांना शरण आली आणि पोलिसांनी तिला मुख्य आरोपी केले आहे.
मंगलदोष बनला हत्येचे कारण?
ज्योतीषी अजय दुबे यांनी सांगितले की, सोनमच्या कुंडलीत मंगल उच्च आहे, तर राजाचा मंगल नीच होता.यामुळे दोघांचा विवाह म्हणजे हानी निश्चित होती. दुबे म्हणाले की सोनम याचा मंगळ उच्च स्थानी आहे. त्यामुळे ज्याच्याशी तिचे लग्न होईल, त्याची हानी निश्चित होती. राजाची हानी झाली आहे, आणि सोनम भविष्यात सोनमने दुसऱ्या कोणाशी विवाह केला तरी हाच परिणाम असेल. सोनम आणि राजाच्या कुंडळी जुळवताना मंगळदोषाची बाब उघड झाली होती. परंतू त्याकडे दुर्लक्ष करुन विवाह करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.




ज्योतिषाची भविष्यवाणी आणि कटाचा उलगडा
ज्योतिषाने राजाची आईला आधीच सावधान केले होते. या लग्नाचा परिमाण चांगला होणार नाही. राजाचा मृतदेह सापडल्यानंतर आणि त्याच्या हत्ये कुणा महिलेचा हात असेल हे आपण वर्तवलेले भविष्य मात्र खरे ठरले आहे. पोलिसांच्या ऑपरेशन हनीमूनने उघड झाले की सोनम तिचा प्रियकर राज कुशवाहा आणि तीन भाडोत्री सुपारीबाज गुंड आकाश राजपूत, विशाल ठाकुर आणि आनंद कुर्मी यांनी मिळून २३ मे रोजी मेघालयाच्या सोहरा येथे हत्येचा कट रचला होता.
सोनमचा कट आणि मंगलदोषाचे कनेक्शन
सोनम हीने लग्नानंतर तीन दिवसानंतरच प्रियकर राज कुशवाह यांच्यासोबत पतीच्या हत्येची योजना बनविली होती. हनीमून दरम्यान कोणताही फोटो अपलोड न करणे आणि हत्येनंतर राजाच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ‘सात जन्माचा साथ’ अशी पोस्ट करणे तपास अधिकाऱ्यांना दिशाभूल करण्यासाठी केले होते.