हनीमूनला जोडपे गेले ते परतलेच नाही, घरचे चितेंत; पोलिस पथकं लागली कामाला
हनिमूनला गेल्यानंतर त्यांचा रोज रात्री फोन यायचा आज हे ठिकाण पाहीले. आज अमुक ठिकाणी मुक्काम केला. परंतू काही दिवसांनी फोन स्विच ऑफ येऊ लागला. त्यामुळे संशय आल्याने आम्ही आमची माणसे शिलाँगला पाठवली, या जोडप्याच्या नातलगांनी सांगितले.

शिलाँगला हनीमुनला गेलेले एक कपल पर्वतात गायब झाले आहे. या कपलशी कोणताही संपर्क होत नसल्याने त्यांचे नातलग आणि कुटुंबिय चिंतेत सापडले आहेत..त्यांच्या कुटुंबियांनी आपल्या मुलांना शोधून काढण्याची विनंती पोलीसांनी करीत ते हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. राजा रघुवंशी आणि त्यांची पत्नी सोनम हिच्यासह मेघालयाच्या शिलाँग येथे फिरायला गेले होते. तेथे वेळोवेळी फोनवर तेथे कुठे कुठे फिरत आहोत, याची माहीती देत कुटुंबियांना रोज रात्री देत होते. परंतू काही दिवसांनी त्यांचा फोन स्विच ऑफ लागू लागला.
त्यानंतर त्यांचे कुटुंबिय राजा आणि सोनम यांना लागोपाठ फोन कॉल करीत आहोत. परंतू कोणी फोन उचलत नाही. त्यांना शोधण्यासाठी काहीजण ए परिजन शिलांगला पोहचले. परंतू गुगल मॅपद्वारे त्यांनी ज्या ठिकाणाहून एक्टीव्हा भाड्याने घेतली होती. त्या व्यक्तीपर्यंत ते पोहचले. तेव्हा त्याने दिलेल्या माहीतीने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली…
या दुकानदाराने हे कपल शिलाँगपासून काही अंतरावर असलेल्या पॉईंटवर फिरायला जातो म्हणून बाईक भाड्याने घेऊन गेले होते. परंतू गाडी परत न केल्याने ते जेथे गेले होते तेथे आपण शोधाशोध केली तेव्हा ही एक्टीव्हा अस्ताव्यस्त पडलेली सापडली आणि या कपलचा कोणताही थांगपत्ता लागला नसल्याचे या एक्टीव्हा मालकाने सांगितले.त्यानंतर राजा यांच्या नातलगांनी शिलाँग पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली.
शिलाँगला पोलिसांचे पथक रवाना
पोलिस आता या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत. इंदूर पोलिस आयुक्तांनाही या प्रकरणाची माहिती दिली. इंदूर पोलिस शिलाँग पोलिसांच्या संपर्कात आहेत. इंदूर पोलिसांनी या जोडप्याचा शोध घेण्यासाठी एक पथक शिलाँगला पाठवले आहे.
यापूर्वीही कपल गायब झालीत
तपासादरम्यान, राजा आणि सोनम ज्या ठिकाणी फिरण्यासाठी गेले होते त्या ठिकाणाची माहिती मिळाली. अशा घटना इतर जोडप्यांसोबतही घडल्या आहेत. सध्या, या कपलच्या नातेवाईकांनी मध्य प्रदेश सरकारकडे आमच्या माणसांना लवकरात लवकर शोधून काढा अशी विनंती केली आहे.