मापात पाप करणाऱ्यांच्या लबाडीला चाप…वैधमापनशास्त्र विभागाकडून कारवाई करत दणका

| Updated on: Nov 18, 2022 | 4:48 PM

गेल्या सहा महिन्यात तर 6 कोटी 65 लाख 85 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई समोर आली आहे.

मापात पाप करणाऱ्यांच्या लबाडीला चाप...वैधमापनशास्त्र विभागाकडून कारवाई करत दणका
Image Credit source: Social Media
Follow us on

नाशिक : वैधमापनशास्त्र विभागाकडून खरंतर दुकानदार, पकर्स यांच्यावर कारवाई केली जाते, त्यासाठीची काही विशेष अशी कारणं नाहीत, पण दैनदीन व्यवहारात आपण हाताळत असलेल्या वस्तूंच्या संदर्भातच ही कारवाई केली जाते. ज्यामध्ये दुकानदारांनी त्यांच्याकडील वजनकाट्यांची पडताळणी न करणे, वजनकाट्यात दोष असणे, पॅकिंग वस्तूंचे वजन प्रत्यक्षात कमी भरणे यावरून कारवाईचा बडगा उगारला जातो. दैनिदिन जीवनात वस्तु खरेदी करत असतांना संबंधित विक्रेता आपली फसवणूक करण्याची दाट शक्यता असते, सहज कमी वजनाच्या वस्तु तो आपल्याला योग्य दिल्याचे देखील भासवू शकतो. म्हणजेच काय तर मापात पाप करून तो आपली फसवणूक करू शकतो. याच पार्श्वभूमीवर कधीकाळी कारवाईचे वजन घटलेल्या वैधमापनशास्त्र विभागाच्या वतिने कारवाईचे वजन वाढल्याचे दिसून येत आहे. यामध्ये काही लबाडांना चाप बसला आहे.

नाशिक विभागात एप्रिल 21 ते मार्च 22 या काळात नाशिक विभागात ३२७ ठिकाणी कारवाया करण्यात आल्या आहेत.

एप्रिल ते ऑक्टोबर 2022 या सहा महिन्यांमध्ये कारवाईचा बडगा उगरण्यात अधिकची वाढ करण्यात आली असून एकूण 440 कारवाया करण्यात आल्या आहे.

हे सुद्धा वाचा

गेल्या सहा महिन्यात तर 6 कोटी 65 लाख 85 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई समोर आली आहे.

नाशिक विभागात गेल्या वर्षी वजनकाटे पडताळणी शुल्क म्हणून 12 कोटी 30 लाख 69 हजार रुपये वसूली करण्यात आली असून ही मोठी कारवाई मानली जात आहे.

पॅकिंग वस्तूवर उत्पादकाचे नाव, माहिती नसणे आणि वजन कमी असणे या विरोधात कारवाई केली जाते असते.

दोषी विक्रेत्याला नोटीस पाठवली जाते. विक्रेत्याने चूक मान्य करून दंड भरण्याची तयारी दर्शवल्यास दंड वसूल करण्याची प्रक्रिया राबविली जात असते.

दरम्यान, याबाबत तुम्हाला काही तक्रार करायची असल्यास हेल्पलाइन क्रमांक 1800222262, ई-मेल – dclmms_complaints@yahoo.com यावर तक्रार करू शकतात.